घरताज्या घडामोडीकोण म्हणतं PUBG बॅन झाला; या चोर मार्गाने आताही खेळू शकता PUBG!

कोण म्हणतं PUBG बॅन झाला; या चोर मार्गाने आताही खेळू शकता PUBG!

Subscribe

सर्वाधिक लोकप्रिय मोबाईल गेम्संपैकी एक असलेला PUBG सह ११८ Apps वर भारतात बंदी घातली आहे. या ११८ चिनी Apps आणि गेम्सला देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी धोकादायक असल्याचे म्हणत सरकारने बुधवारी या आदेशाची घोषणा केली. या निर्णयाने अनेकांना धक्का बसला असेल. PUBG चे चाहते निराश झाले आहेत. पण तमाम चाहत्यांनो काळजी करण्याची गरज नाही. कारण PUBG बॅन नंतरही तुम्ही हा खेळ खेळू शकता.

PUBG चे देशात लाखो चाहते आहेत. लहान-मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा हा गेम आहे. मात्र PUBG हा मुळात चायनिज गेम नाही आहे. हा गेम दक्षिण कोरियाच्या एका कंपनीने तयार केला आहे. दक्षिण कोरियाच्या ब्ल्यूहोल कॉ. या कंपनीने बॅटल गेम तयार करणार ब्रेंडन ग्रीनकडून २०१६ मध्ये एक गेम तयार करून घेतला. ब्रेंडनने याआधी जपानी बॅटल गेम तयार केला होता. त्याच धर्तीवर २०१७ मध्ये PUBG मार्केटमध्ये आला.

- Advertisement -

PUBG मार्केटमध्ये आल्यानंतर तुफान प्रसिध्द झाला. त्यानंतर ब्ल्यूहोल कॉ. या कंपनीने आपलं नाव बदलून PUBG CO असं केलं. त्यानंतर एका चिनी कंपनीला हा गेम आवडला आणि त्यांनी आपल्या पद्धतीने हा गेम तयार करण्यासाठी पब्जी कॉ. कडून या गेमचे ११टक्के हिस्सा खरेदी केला.

पब्जी हा गेम सर्वात आधी डेक्सटॉप म्हणजे कम्प्यूटरवर खेळला जात होता. मात्र टेन्सेंटने २०१८ मध्ये पब्जीचे मोबाइल व्हर्जेन लॉंच केलं. यानंतर मोबाइलवरचा गेम भारतासह इतर सर्वच देशांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यामुळे मोबाइलवरचा गेम हा टेन्सेंट या कंपनीच्या नावावर आहे. त्यामुळे भारतातून पब्जी गेम बॅन झाला असला तरी कम्प्यूटवरून हा गेम खेळू शकता. कारण ते व्हर्जेन पब्जी कॉ. या दक्षिण कोरियन कंपनीच्या नावावर आहे.

- Advertisement -

९९९ मोजावे लागणार

PUBG गेम मोबाइलवरून फ्री होता. मात्र कम्प्यूटरवरून खेळण्यासाठी तुम्हाला ९९९ रूपये मोजावे लागणार आहेत. यासाठी तुम्हाला Core i5-4430 किंवा AMD FX-6300 प्रोसेसर असलेल्या 8GB of RAM पीसीची गरज असेल. जर तुमचा पीसी 8GB of RAMचा नसेल तर तुम्ही PUBG लाइट पीसीच्या माध्यमातून खेळू शकता. त्यामुळे आता PUBG च्या चाहत्यांनो बिनधास्त तुमचा आवडता गेम आता खेळा.


हे ही वाचा – PUBG App Ban: पब्जीला आहेत हे लोकप्रिय गेम्सचे पर्याय


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -