घरताज्या घडामोडीCovid-19 Vaccine: आपात्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला WHOची मिळू शकते मंजूरी; २६ ऑक्टोबरला होणार...

Covid-19 Vaccine: आपात्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला WHOची मिळू शकते मंजूरी; २६ ऑक्टोबरला होणार बैठक

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटना (WHO) भारतीय बनावटची कोवॅक्सिन लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण आता याबाबत विचारविनिमय करण्यासाठी डब्ल्यूएचओ तांत्रिक सल्लागार गटाची बैठक २६ ऑक्टोबरला करणार आहे. याबाबतची माहिती डब्ल्यूएचओच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या की, डब्ल्यूएचओ डोजियर पूर्ण करण्यासाठी भारत बायोटेकसोबत मिळून काम करत आहे.

दरम्यान डब्ल्यूएचओने आतापर्यंत सहा कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आत्पाकालीना वापरासाठी मंजूरी दिली आहे. यामध्ये फायझर-बायोएनटेक, जॉनसन अॅड जॉनसन, ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनिका, मॉडर्ना, सिनोफार्म आणि सिनोवॅक्स लसींचा समावेश आहे. त्यामुळे सध्या कोवॅक्सिन लसीला आपात्कालीन वापरासाठी डब्ल्यूएचओकडून मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भारतच्या CDSCO म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशनच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यासाठी शिफारस केली आहे. कमिटीने कंपनीकडून २ ते १८ वयोगटातील मुलांवर झालेल्या क्लिनिकल ट्रायलच्या अहवालाच्या आधारावर ही शिफारश केली आहे. ज्यामध्ये कोवॅक्सिन लस लहान मुलांसाठी सुरक्षित आणि रोगप्रतिकारक असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

देशात सध्या कोवॅक्सिन लस १८ वर्षांवरील लोकांना दिली जात आहे. मुलांवर या लसीची ट्रायल झाली नव्हती. त्यामुळे मे महिन्यात मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी मान्यता देण्यासाठी मागणी केली होती. मान्यता मिळल्यानंतर संपूर्ण देशातील निवडक मुलांवर कोवॅक्सिन लसीचे ट्रायल केले होते. या ट्रायलमध्ये मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे की नाही आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते का? हे सर्व पाहिले गेले. त्यानंतर या ट्रायलचा अहवाल सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशनकडे पाठवला होता. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ही लस देण्याची शिफारस कमिटीने केली आहे. पण आता याबाबतचा अंतिम निर्णय डीसीजीआय घेईल.


हेही वाचा – आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वपूर्ण माहिती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -