Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE कोरोनाचा भारतीय स्ट्रेन दुप्पट धोकादायक, WHO चा मोठा खुलासा

कोरोनाचा भारतीय स्ट्रेन दुप्पट धोकादायक, WHO चा मोठा खुलासा

नवा विषाणु आता कोरोना लसीलाही चवका देत असल्याचे समोर आले आहे.

Related Story

- Advertisement -

भारतात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणुचा नवा व्हेरियंट झपाट्याने पसरत असून तो भारतासाठी दुप्पट धोकादायक असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे. तसेच हा विषाणु उत्परिवर्तन विषाणूपेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याने शरीरातील अँटिबॉडीज तयार करण्यास अटकाव करतो असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट भारतातून पसरत असून तो इतर देशांमध्येही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अमेरिका आणि ब्रिटन देशांनी या भारतातील नव्या व्हेरियंटला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ या कॅटेगरीमध्ये ठेवले आहे. परंतु हा नवा विषाणु आता कोरोना लसीलाही चवका देत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान भारतात दररोज २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून ४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित मृत होत आहेत. यावर बोलताना डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, भारतात कोरोना विषाणुच्या नव्या व्हेरियंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे या विषाणुला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. त्या नवा विषाणु आता कोरोना लसीलाही चवका देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे भारताने लसीकरण मोहिम वेगाने राबवली पाहिजे.

- Advertisement -

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोना नवा व्हेरियंट जर कोरोनाविरोधी लसीलाही चकवा देत असल्यास  जगासाठी चिंताजनक बाब आहे असे WHO नेही स्पष्ट केले. दरम्यान कोरोना विषाणूचा नवा १.६१७ हा नवा प्रकार भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात आढळून आला होता. त्यामुळे संर्सगाचा विस्फोट झाला. अमेरिका, ब्रिटन देशानेही कोरोनाचा नव्या विषाणूला रोखण्यासाठी अनेक पावले उचलली. तर भारतामध्ये नागरिक या विषाणूपासून वाचवण्यासाठी कोरोनाविरोधी नियमांना गांभीर्याने घेत नाहीत. अनेक भागात वाढणारी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा यामुळे कोरोना नियमांना बगल देत भारतीय वावर असल्याने भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस अधॉनम घेब्रेयेसुस म्हणाले की, WHO सध्या भारतातील आरोग्य कामगारांसाठी ऑक्सिजन, औषधे आणि संरक्षणात्मक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी ”टुगेदर फॉर इंडिया” ही मोहिम राबवत आहे.

निवडणुक प्रचारसभा कोरोना विस्फोटास कारणीभूत 

- Advertisement -

दरम्यान देशात पंतप्रधान मोदी आणि अन्य नेत्यांनी आयोजित केलेल्या निवडणुका, प्रचारसभा कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन व्यक्त केले. दरम्यान कोरोनाची पहिली लाट कमी झाल्याने अनेक भारतीयांनी कोरोना संपला असा करत कोरोना नियमांविरुद्ध वागण्यास सुरुवात केली त्यामुळे विषाणू प्रचंड वाढला.

दरम्यान भारतात लसीकरण मोहिम अगदी धिम्या गतीने सुरु आहे. देशात आत्तापर्यंत लोकसंख्येचा तुलनेत फक्त २ टक्केच नागरिकांना लस दिली आहे. अशी गतीने ७० ते ८० टक्के नागरिकांना लस देण्यासाठी कित्येक महिने लागू शकतात असेही मत डॉ़. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले.


 

- Advertisement -