लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते; WHO चा इशारा

कोरोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव कमी होत जाईल असा विचार करणं चुकीचं आहे.

FILE PHOTO: Mike Ryan, Executive Director of the World Health Organisation (WHO), attends a news conference at the United Nations in Geneva, Switzerland May 3, 2019. REUTERS/Denis Balibouse/File Photo

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉक़ाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र अनेक देशांनी हा लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लॉकडाऊन हटवणाऱ्या निर्णय घेतलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर देशांनी लॉकडाऊन उठवण्यात घाई केली तर कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. काही देशांमध्ये कोरोनाची संख्या कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि अफ्रिका येथील संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन उठवण्याची घाई करू नये असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी सांगितलं आहे.

हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगात ५० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये ज्या भागात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन कोरोनाची दुसरी लाट टाळता येईल.

कोरोना कोणत्याही क्षणी वाढू शकतो

कोरोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव कमी होत जाईल असा विचार करणं चुकीचं आहे. आणि आपल्याकडे दुसरी लाट येण्याआधी तयारीसाठी खूप वेळ आहे असा विचार अजिबात करता कामा नये. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एका महिन्यात तो पुन्हा वाढू शकतो,” असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.


हे ही वाचा – मोदी-योगींवर आक्षेपार्ह टीका; काँग्रेसच्या अलका लांबाविरोधात FIR