घरताज्या घडामोडीपाकिस्तानात कोरोनाचा कहर; WHOने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा दिला इशारा!

पाकिस्तानात कोरोनाचा कहर; WHOने पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा दिला इशारा!

Subscribe

पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर WHOने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

पाकिस्तानात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यास सांगितला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, ‘पाकिस्तान दोन आठवड्याच्या अंतराने लॉकडाऊन ठेवायचे आणि त्यानंतर सूट द्यायचे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन लागू करणे आवश्यक आहे.’

जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानच्या पंजाबचे आरोग्य मंत्री डॉ. यास्मिन राशिद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘तुमच्या देशातील लॉकडाऊन हटवण्यासाठीच्या अटी पूर्ण केल्या जात नाहीत. पाकिस्तानने १ मे रोजी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली होती आणि २२ मे रोजी पूर्णपणे सूट देण्याचा निर्णय घेतला.’ जागातिक आरोग्य संघटनेचे पाकिस्तान देशाचे हेड डॉ. पलिता महीपाल यांनी ७ जून रोजी पत्र लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, ‘पाकिस्तानात प्रत्येक जिल्हात कोरोना विषाणू पसरला आहे. शहरांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.’

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, ‘लॉकडाऊन हटवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. जसे की विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण आणणे, तपासणी करणे, आयसोलेट करणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेस करण्यासाठी सक्षम होणे महत्त्वाचे आहे. शिवाय लोकांमध्ये जागरूकता करणे गरजेचे आहे.’

मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान लॉकडाऊनला विरोध करतात. खान यांचे म्हणणे आहे की, ‘गरीब देशावर लॉकडाऊनचा परिणाम अधिक होईल आणि गरीबांचे सर्वाधिक नुकसान होईल.’ त्यांनी भारतामध्ये लॉकडाऊन नंतर झालेल्या परिस्थितीतचे उदाहरण दिले.

- Advertisement -

२०१८ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानची लोकसंख्या २१.२ कोटी आहे. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोनाचे १ लाख १३ हजार ७०२ रुग्ण आढळले आहेत. तर २ हजार २५५ लोकांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणारे चीनवर प्रश्न विचारत आहेत – रविशंकर प्रसाद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -