घरदेश-विदेशअभिनंदन यांच्यासोबतच्या 'या' महिला कोण? घ्या जाणून

अभिनंदन यांच्यासोबतच्या ‘या’ महिला कोण? घ्या जाणून

Subscribe

'भारताचा वाघ परत आला' म्हणत लाखो भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं 'अभिनंदन' करत आहेत.

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात सापडलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान  सुखरुप आपल्या मायदेशी परतले. अभिनंदन यांना काल रात्री १० च्या सुमारास वाघा बॉर्डरद्वारे भारतात पाठवण्यात आले. त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या तमाम देशवासीयांनी काल रात्री एकच जल्लोष केला. ‘भारताचा वाघ परत आला’ म्हणत लाखो भारतीयांनी अभिनंदन यांचं ‘अभिनंदन’ केले. दरम्यान, दोन्ही देशांच्या प्रोटोकॉलनुसार अभिनंदन यांची रितसर पाठवणी करण्यात आली. यावेळी डौलदार पावलं टाकत भारताच्या सीमेकडे येत असलेल्या वर्धमान यांच्यासोबत पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि एक महिलादेखील होत्या. दरम्यान, या महिला नक्की कोण आहे? असा प्रश्न बहुतांशी लोकांना पडला आहे. काही लोकांनी तर सोशल मीडियावर ‘या’ महिला वर्धमान यांची पत्नी असल्याचादेखील दावा केला. मात्र, त्या नेमक्या कोण होत्या, याचा अखेर उलगडा झाला आहे.

कोण होत्या ‘त्या’ महिला?

अभिनंदन पाकिस्तानची सीमारेषा ओलांडताना त्यांच्यासोबत असलेल्या त्या महिला आणि त्यांचा कोणताच थेट संबंध नाही. त्या महिला त्यांच्या कुटुंबाची सदस्यही नाहीत. समोर आलेल्या माहितीनुसार, त्या महिला पाकिस्तानच्या विदेशी कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. डॉ. फरेहा बुग्‍ती असं त्यांचं नाव असून त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे संचालिका आहेत. भारताच्या परराष्ट्र सेवा अधिकाऱ्याप्रमाणे त्यांचे स्वतंत्र्य स्थान आहे. पाकच्या कारावासात कैद असलेल्या भारतीय कुलभूषण जाधव यांचे प्रकरणदेखील फरेहा बुग्‍ती हाताळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -