घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? सिद्धरमय्यांच्या वक्तव्याने हायकमांड चिंतेत

कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? सिद्धरमय्यांच्या वक्तव्याने हायकमांड चिंतेत

Subscribe

कर्नाटकात काँग्रेसने एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे. पण कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. पण लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबतची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेसने एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे. पण कर्नाटकाचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. पण लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबतची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरमय्यांच्या विधानाने काँग्रेस हायकमांडला चिंतेत टाकले आहे. (Who will be CM of Karnataka? high command is worried about Siddaramaiah statement) विजयी झालेल्या अनेक आमदारांनी खर्गेंसमोर मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव घेतले आहे. बहुतेक आमदार हे माझ्या बाजूने आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी डीके शिवकुमार की सिद्धरमय्या असा मोठा पेचप्रसंग काँग्रेसच्या हायकमांडसमोर उभा ठाकला आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात यावी, असे नवनिर्वाचित आमदारांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून विचारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी बहुतांश आमदारांनी आपलेच नाव घेतले असल्याची माहिती सिद्धरमय्या यांच्याकडून देण्यात आली आहे. कर्नाटकातील मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी पर्यवेक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम याबाबतचा अहवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवणार आहे. त्यासाठी आज आज सिद्धरामय्या आणि अनेक बडे नेते खर्गे यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठणार आहेत. दरम्यान, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी मोठे वक्तव्य केल्याने पक्ष हायकमांडच्या अडचणी वाढल्या आहेत. पर्यवेक्षकांसमोर आमदारांनी माझे नाव घेतले असून, बहुतेक माझ्या बाजूने आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे आता खर्गे शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यामधून कोणाची निवड करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

शिवकुमारशी चांगले संबंध..
तसेच, डीके शिवकुमार यांच्याशी माझे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत आणि भविष्यातही ते कायम राहतील, असे यावेळी सिद्धरमय्या यांच्याकडून सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे बोलले जात होते. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरमय्या यांच्यामध्ये अंतर्गत वाद असल्याचेही अनेकदा सांगण्यात आले होते.

खर्गे अंतिम निर्णय घेतील..
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असलेले सिद्धरामय्या आज (ता. 15 मे) दिल्लीला रवाना झाले आहेत. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरमय्या एआयसीसी नेत्यांना भेटण्यासाठी विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे याबाबत बोलताना म्हणाले होते की, गरज भासल्यास मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना विचारविनीमय करण्यासाठी दिल्लीला बोलावले जाईल. त्याप्रमाणे सिद्धरमय्या हे दिल्लीला पोहोचले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -