घरट्रेंडिंगराष्ट्रपतीपदासाठी पवार-फारूक यांनी नकार दिल्याने विरोधक कोणाला उभं करणार? 'या' नावांची चर्चा

राष्ट्रपतीपदासाठी पवार-फारूक यांनी नकार दिल्याने विरोधक कोणाला उभं करणार? ‘या’ नावांची चर्चा

Subscribe

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी या पदासाठी नकार दिलाय. त्यामुळे भारताचा पुढचा राष्ट्रपती कोण असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीची तयारी सुरू आहे. देशातील अनेक पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. २९ जून रोजी उमेदवारी जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. तर, १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. २१ जुलै रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी या पदासाठी नकार दिलाय. त्यामुळे भारताचा पुढचा राष्ट्रपती कोण असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Who will be the next candidate for President election from Oppositions, this names are in discussion)

हेही वाचा – शरद पवारांनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी नकार

- Advertisement -

राष्ट्रपतीच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षाने एकजूट करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी १५ जून रोजी दिल्लीत देशातील विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीत आम आदमी पार्टी, तेलंगनाची टीआरएस आणि ओडिसाची बीजेडी तसेच, आंध्र प्रदेश वाईएसआर काँग्रेस आदी पक्ष सामिल झाले नाहीत.

विरोधी पक्षाच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी, शरद पवार आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांनी नकार दिला, तर विरोधी पक्षांकडून लवकरच उमेदवार जाहीर करू अंस सांगितलं. तसेच, शरद पवार हे तयार झाले तर त्यांना विरोधी पक्षांचा पाठिंबा असेल असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रपतीपदासाठी राजकीय उंची लागते, सदावर्तेंची पवारांवर टीका

शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र, त्यांनीही हा प्रस्ताव फेटाळला.

नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मी भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार मागे घेत आहे. मला विश्वास आहे की जम्मू आणि काश्मीर एका महत्त्वपूर्ण वळणावरून जात आहे आणि या अनिश्चित काळात मार्ग काढण्यासाठी माझ्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.
शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला यांनी नकार दिल्यानंतर अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. यातील किती जण उमेदवारी जाहीर करतात आणि कोण राष्ट्रपती पदावर विराजमान होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


गोपालकृष्ण गांधी – पश्चीम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांचं नाव सध्या राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे. गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आहेत. तसेच, ते आयएएस अधिकारी सुद्धा होते. २०१९ साली झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी गोपालकृष्ण गांधी यांना विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्या निवडणुकीत वैंकया नायडू यांनी बाजी मारली.

यशवंत सिन्हा – माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्याही नावाची प्रचंड चर्चा आहे. यशवंत सिन्हा हे भाजपचे मोठे नेते होते. मात्र, ते आता टीएमसीमध्ये आहेत.

एनके प्रेमचंद्रन – खासदार एनके प्रेमचंद्रन केरळ सरकारमध्येही मंत्री होते. दक्षिण भारतातील राजकीय पक्षांचं समर्थन मिळण्यासाठी त्यांचं नाव पुढे करण्यात येत आहे. कारण ममता बॅनर्जी यांनी १५ जूनला बोलावलेल्या बैठकीत आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि तेलंगणातील टीआरएस गैरहजर राहिले होते. यापैकी कोणत्याही एका पक्षाने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास विरोधकांचा मार्ग खडतर होऊ शकतो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -