घरCORONA UPDATECorona Vaccine : सर्वात पहिली लस कोणाला?; विविध देशांमध्ये शोध सुरू

Corona Vaccine : सर्वात पहिली लस कोणाला?; विविध देशांमध्ये शोध सुरू

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने पसरला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आणि मृत्यू झाले आहेत. संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूवर लस बनवण्याचे प्रयोग सुरू आहेत. कधी एकदा ही लस बनून तयार होते आणि ती लोकांना देतोय, असे सर्व देशांना झाले आहे. सध्या काही लसींचे परिक्षण सुरू आहे. अमेरिकेसह इतर राज्यांमध्येही कोणाकोणावर या लसींचे प्रयोग केले जातील, याचा शोध सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्ससह २००९ साली H1N1 इंफ्लूएंजा हे स्वाईन फ्लूवर लस बनवलेल्या लोकांचा समावेश आहे.

- Advertisement -

अमेरिकेत सर्वात पहिला डोज दिला जाईल अशी चर्चा होत आहे. त्यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरीक, अत्यावश्यक सेवेतील कामगार, आयसीयूमध्ये दाखल झालेले रूग्ण आणि अतिगंभीर अवस्थेतील रूग्णांचा समावेश आहे. मात्र अद्याप यावर काही ठोस निर्णय झालेला नाही. अमेरिकेत क्लिनिकल ट्रायल्समध्ये दोन लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या परिक्षणाच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. याची चाचणी साधारण ३० हजार जणांवर केली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जी लस उत्तम काम करत आहे, त्याचे पहिले डोज या वर्षाअखेरीस मिळतील. नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थचे संचालक फ्रान्सिस कोलिंस यांनी सांगितले की, सर्वात पहिली लस कोणाला दिली जाणार हा वादाचा मुद्दा आहे. यावर कोणीही ठोस उत्तर देऊ शकत नाही. अमेरिकेतील सरकार यासंबंधी प्राधान्य कोणाला द्यायचे यावर काम करत आहे.

हेही वाचा –

चीनला आणखी एक झटका! चीनसह ‘या’ देशांतील Colour TV च्या आयातीवर बंदी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -