घरदेश-विदेशPrashant Kishor : मोदींनंतर भाजपचे नेतृत्व? प्रशांत किशोर म्हणतात.. तो अधिक कट्टर...

Prashant Kishor : मोदींनंतर भाजपचे नेतृत्व? प्रशांत किशोर म्हणतात.. तो अधिक कट्टर असेल

Subscribe

नवी दिल्ली : देशभरातील राज्यसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून 15 राज्यातील 56 जागांसाठी पुढील महिन्यात 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकांही पुढील काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागले आहेत. अशातच आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकांवर भाष्य करताना भाजपावर टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाचे नेतृत्व कोणाकडे असेल? असा प्रश्न विचारला आला. यावर प्रशांत किशोर यांनी उत्तर दिले की, मोदींनंतर भाजपाच्या हायकमांडमध्ये कोण असेल हे मला माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही जास्त कट्टर असेल. (Who will lead BJP after Modi Prashant Kishor says He will be more fanatical than them)

हेही वाचा – Election 2024 : ठाकरे, पवारांची माघार; पूर्व विदर्भात काँग्रेसकडेच सर्वाधिक जागा?

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि जेडीयूमधील संबंधांवर भाष्य केले आहे. त्यांनी सांगितेल की, विरोधी पक्षांची एकजूट नष्ट व्हावी, यासाठी भाजपाने नितीशकुमारांना सोबत आणले आहे. खरं तर भाजपाने जेडीयूला आधीच गिळंकृत केले आहे. हे फक्त नितीश कुमार यांनाच माहीत आहे. पण जेडीयूमध्ये सध्या जे कोणी नेते आहेत, त्यांना घेऊन नितीश कुमार यांना आणखी काही काळ मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. 18 वर्षे नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, मात्र आता त्यांच्या खेळीचा हा शेवटचा टप्पा आहे, असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.

भाजपाने आधार योजना लोकापर्यंत पोहचवली

प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसने आधार योजना आणली होती. पण त्यांना योजनेचा फायदा कधीच घेता आला नाही. याउलट भाजपाने ही योजना लोकांपर्यंत पोहोचवली. यामुळे सर्व योजना आधारशी जोडल्या गेल्या आणि भाजपाने या गोष्टला आपल्या प्रचाराचा भाग बनवले. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला आहे. त्यानंतर काँग्रेस आता या योजनेच्या श्रेयाबद्दल बोलत आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.

- Advertisement -

प्रशांत किशोर यांचे महिला मतदारांना महत्त्व

नरेंद्र मोदी सतत आपली प्रतिमा बदलत आहेत. त्यामुळे त्यांना सातत्याने निवडणुकीत यश मिळत आहे, असे वक्तव्य करताना प्रशांत किशोर यांनी महिला मतदारांनाही महत्त्व दिले. ते म्हणाले की, पुरुष जाती आणि विभाजनाच्या नावावर आंदोलन करताना दिसतात, मात्र जेव्हा राम मंदिराचा प्रश्न येतो तेव्हा फक्त महिला दिसतात. यामुळे महिला या एक वेगळी व्होट बँक म्हणून समोर येत आहेत.

हेही वाचा – Narendra Modi : महिन्याभरात मोदी पुन्हा महाराष्ट्रात; कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं करणार उद्घाटन

जनतेमध्ये जाऊन संदेश द्यावा लागेल

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर प्रश्न उपस्थित करताना प्रशांत किशोर म्हणाले की, मी सातत्याने काँग्रेसला नव्या अवतारात येण्याचा सल्ला देत आलो आहे. राजकारण हे देखील शेअर बाजारासारखे असते. इथे एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर उडी मारता येत नाही. कधी राफेलबद्दल बोलता तर कधी हिंदुत्वाबाबत. हे सर्व चालणार नाही. तुम्हाला एका मुद्द्यावर चिकटून राहून जनतेमध्ये जाऊन संदेश द्यायचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -