घरताज्या घडामोडीInflation : महागाईचा तडाखा! ऑक्टोबरमध्ये महागाई दर दुप्पट, कधी मिळणार सर्वसामान्यांना दिलासा?

Inflation : महागाईचा तडाखा! ऑक्टोबरमध्ये महागाई दर दुप्पट, कधी मिळणार सर्वसामान्यांना दिलासा?

Subscribe

देशात महागाईचे दर पहिल्या क्रमांकावर...

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईचे दर वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये किरकोळ बाजारांतील महागाईचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागील महिन्यात महागाईचे दर (Wholesale Price Index – WPI) वाढून १२.५४ टक्क्यांवर पोहोचले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये १०.६६ टक्के इतके होते. परंतु मागील महिन्यात तब्बल २ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील ५ महिन्यांतील महागाईचे दर देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. इंधन आणि वीजेच्या किंमतीच्या दरात सुद्धा वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. तसेच महागाईसोबतच उत्पादीत वस्तूंच्या किंमतीत पण वाढ झाली आहे.

होलसेलच्या किंमतीत वाढ झाली असून एक व्यापारी दुसऱ्या व्यापाराकडून वस्तू विकत घेत आहे. CPI ची किंमत सर्वसामान्य ग्राहकांच्या आधारावर ठरवली जाते. CPI च्या आधारीत वाढलेली महागाई रिटेल पेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी रिटेल महागाईच्या दरांच्या आकडेवारीत वाढ झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात महागाईचे दर ४.३५ टक्क्यांनी वाढून ४.४८ टक्के झाले आहेत. हा आकडा आरबीआयच्या महागाईनुसार २ ते ६ टक्क्यांच्या आत आहे.

- Advertisement -

ऑक्टोबरमध्ये महागाई दर दुप्पट

सरकारने जारी केलेल्या आकड्यांनुसार, ऑक्टोबर महिन्यात WPI १०.६ ने वाढून १२.५४ टक्के इतकी झाली आहे. तर खाण्या-पिण्याच्या वस्तूंत देखील वाढ ३.०६ टक्क्यांनी वाढ झालीये. भाजांचे दर ३२.४५ टक्क्यांनी वाढून १८ टक्क्यांच्या वर गेले आहेत. उत्पादन वस्तूंच्या किंमतीत ११ टक्क्यांपेक्षा १२.०४ टक्क्यांची वाढ झालीये. इंधनाच्या दरात मोठी वाढ झालीये.

कधी मिळणार सर्वसामान्यांना दिलासा?

इंधनाच्या दरामुळे देशात महागाईचा तडाखा सुरू आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्समध्ये कपात केली असून त्याच्या किंमतीत घट झाली आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्यांच्या आकड्यांत दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून महागाईच्या दरात ऑक्टोबर महिन्यामध्ये ०.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील महिन्यात ०.६८ टक्के इतकी होती. २०२२-२०२३ च्या एप्रिल आणि जूनच्या तिमाहीतच्या दरम्यान रिटेलच्या किंमतीत ५.२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा: Delhi करांचा श्वास कोंडला, प्रदूषणात वाढ ; देशात ५०० कोटींच्या वर वाढली एअर प्युरीफायरची डिमांड


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -