Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे? मोदींसोबत नातं काय? राहुल गांधींकडून...

अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी कोणाचे? मोदींसोबत नातं काय? राहुल गांधींकडून सरबत्ती

Subscribe

Rahul Gandhi counter to Narendra Modi | अदानी नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंधात बोललो. नातं नवी नाही. गुजरातचे सीएम असताना मोदींचे त्यांच्याशी संबंध. त्याचे अनेक सार्वनिजक पुरावा आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi counter to Narendra Modi | नवी दिल्ली – हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाचे गौतम अदानी विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संसदेतही हा मुद्दा उचलून धरला. अदानींविषयी प्रश्न विचारले. परंतु, कालांतराने त्यांना बोलू दिलं गेलं नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले.

हेही वाचा – खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधींचा निर्धार; म्हणाले, मी प्रश्न विचारतच राहणार!

- Advertisement -

गोतम अदानी यांची शेल कंपनी आहे. या कंपनीत २० हजार कोटी गुंतवण्यात आले आहेत. परंतु, या गुंतवणुकीचा पैसा अदानींचा नाही. अदानींचा इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय आहे. हे पैसे कोणाचे आहेत, हा प्रश्न मी विचारला होता. मी संसदेत पुरावा सादर केला होता. अदानी नरेंद्र मोदी यांच्यातील नातेसंबंधात बोललो. नातं नवी नाही. गुजरातचे सीएम असताना मोदींचे त्यांच्याशी संबंध. त्याचे अनेक सार्वनिजक पुरावा आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

“देशातील विमानतळ नियमांना बगल देऊन अदानींना देण्यात आले. याचा पुरावाही दिला. मी यासंदर्भात पत्र लिहिले. परंतु, काही फरक नाही पडला. मला खोट्यात पाडण्यासाठी मंत्र्यांनी माझ्याविरोधात अफवा पसरवली की मी परदेशी ताकदींकडून मदत मागितली. परंतु, संसदेचा नियम आहे. कोणत्याही सदस्यांवर आरोप लागला तर त्यांना उत्तर देण्याचा हक्क असतो. मी यासाठीही पत्र लिहिलं. पण, त्यांचं उत्तर नाही आलं. मग मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे गेलो. मला बोलू देण्याची विनंती केली. पण, मला बोलू दिलं गेलं नाही. मी बोलायला देऊ शकत नाही असं स्पीकर म्हणाले. त्यानंतर जे झालं ते सर्वांनी पाहिलं. नरेंद्र मोदींचं अदानींसोबत काय नातं आहे आणि २० हजार कोटी रुपये कसले आहेत हे मी विचारत राहणार, मला याचं काहीही वाटत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढतोय. मी कोणालाही घाबरत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

माझं नाव सावरकर नाही

राहुल गांधी यांची शिक्षा कमी करण्याकरता त्यांना माफी मागण्यास सांगण्यात आलं होतं. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारता ते म्हणाले की, माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी. गांधी कोणाची माफी मागत नाहीत.

- Advertisment -