घरताज्या घडामोडीप्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी चार वर्षांच्या मादी चित्त्याचं नाव आशा का ठेवलं? जाणून...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी चार वर्षांच्या मादी चित्त्याचं नाव आशा का ठेवलं? जाणून घ्या यामागचं कारण

Subscribe

मध्य प्रदेशच्या कुनो-पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात 17 सप्टेंबरला चित्ते दाखल झाले. या चित्त्यांमधील चार वर्षाच्या एका मादी चित्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा हे नाव दिलं आहे.

नामीबियामधून शनिवार, 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातून लुप्त झालेले चित्ते 70 वर्षांनी परत आणण्यात आले. मध्य प्रदेशच्या कुनो-पालपूर राष्ट्रीय अभयारण्यात 17 सप्टेंबरला चित्ते दाखल झाले. या चित्त्यांमधील चार वर्षाच्या एका मादी चित्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा हे नाव दिलं आहे. कुनो व्यवस्थापनानुसार ही मादी चित्ता लवकरच प्रजननक्षम होईल आणि चित्त्यांचे प्रजनन करेल. त्यामुळे प्रधानमंत्रीनी हीला आशा असे नाव दिले आहे. तसेत कुनो व्यवस्थापनाच्या मते, येत्या काळात चित्त्यांच्या स्वभावानुसार त्यांना नावे दिली जातील.

अजून चित्ते पाठवण्यात येतील
लारी मार्कर नामीबियामधून भारतापर्यंत चित्त्यांना आणण्यामध्ये समन्वय साधतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही वर्षांत नामिबियातून भारतात आणखी काही चित्ते पाठवण्यात येतील. त्यांच्या मते, भारतामध्ये चित्त्यांची लोकसंख्या वाढवायची असेल तर आणखी चित्ते जास्त संख्येने भारतामध्ये आणावे लागेल. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये यांच्यामध्येही हे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी ते म्हणाले की, चित्ता वाचवणे म्हणजेच जगाला बदलणे. भारतामध्ये मागील 70 वर्षांपूर्वी चित्ते लुप्त झाले होते. त्यांच्या लुप्त होण्याचं कारण मनुष्य आहेत आणि आता त्यांचे अस्तित्व देखील मानवाच्या हातामध्ये आहे. हे आपल्या सगळ्यांवर अवलंबून आहे की, आपण जागरूक राहावं. आपणचं पृथ्वीला, स्वतःला आणि चित्त्यांना वाचवू शकतो.

- Advertisement -

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला या चित्त्यांना जंगलात सोडले. यासाठी विशेष अधिवास तयार करण्यात आला आहे. एक महिनाभर चित्त्यांना येथे ठेवले जाणार आहे. 1948 मध्ये छत्तीसगढच्या कोरिया भागात रामगढच्या जंगलात महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी देशातील अखेरचे तीन चित्ते मारले होते. 16 व्या शतकात देशात हजारो चित्ते होते. मात्र, राजा-महाराजांनी केलेल्या शिकारीमुळे चित्त्यांची संख्या कमी झाली. 1952 मध्ये भारत सरकारने चित्त्याला विलुप्त प्रजाती घोषित केले. संपूर्ण जगात सध्या 7000 चित्ते आहेत. यातील बहुतांश चित्ते आफ्रिकेच्या जंगलात आहेत.


हेही वाचा :

‘या’ दिवशी भारतात दाखल होणार चित्ते, तयार करण्यात आलाय विशेष अधिवास

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -