घरदेश-विदेशकोण आहेत हजारा? पाकिस्तानात त्यांनाच का मारले जाते?

कोण आहेत हजारा? पाकिस्तानात त्यांनाच का मारले जाते?

Subscribe

पाकिस्तानातील बलोचिस्तान प्रांतात क्वेट्टा शहरातील स्फोटात हजारा जमातीचे लोक ठार झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून हजारा लोकांना पाकिस्तानमध्ये लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानमधील नॅशनल कम्युनिटी फॉर ह्युमन राईटस् यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षात या जमातीचे 509 लोक पाकिस्तानात विविध हल्यांमध्ये मारले गेले, तर 627 लोक जखमी झाले. कोण आहेत हे हजारा पाकिस्तानात त्यांनाच का लक्ष्य केले जाते?

चंगेज खानचे वंशज

हजारा जमात ही मंगोलवंशीय जमात आहे. मूळची अफगाणिस्तानातील शिया मुस्लीम पंथीय ही जमात आहे. अफगानिस्थानातील चंगेज खानचे हे वंशज समजले जातात. चंगेज खानच्या पदरी हजार निवडक सैनिक होते. त्यावरून या जमातीचे नाव पुढे हजारा पडल्याचे सांगितले जाते. तुर्की असलेल्या चंगेज खानने शिया धर्माचा स्वीकार केला होता. मानववंशाच्या अभ्यासकांच्या मते हजारा हे शुद्ध मंगोल नसून मंगोल आणि मध्य आशियातीली अतिप्राचिन जातींचे मिश्रण आहेत. त्यांचे बारीक डोळे आणि नाकाची ठेवण यामुळे ते सहज ओळखू येतात. दरी फारसी भाषा बोलणारे ही जमात आहे. अफगाणिस्थानातील एकूण लोकसंख्येपैकी 18 टक्के हिस्सा या लोकांचा आहे. शेजारील इराण आणि पाकिस्तानाही या जमातीचे वास्तव्य आहे. पाकिस्तानात सुमारे 10 लाखांच्या आसपास त्यांची संख्या आहे. भाजी आणि फळे विकण्यासारखे त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत.

- Advertisement -

सुन्नी विरूद्ध शिया वाद

1980 च्या दशकात तत्कालिन सुन्नी पंथीय तालिबान च्या काळात बामियान आणि दायकुंदीसारख्या ठिकाणी असलेल्या हजारांवर मोठठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाले. उपासमारीने अनेकांना त्यावेळी जीवही गमवावा लागला. त्यामुळे लाखो हजारांनी शेजारी पाकिस्तान आणि इराणमध्ये स्थलांतर करून शरणार्थी म्हणून जगणे स्वीकारले. विशेषत: क्वेट्टा शहराजवळ त्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणावर आहे. तालिबानच्या पाडावानंतरही त्यांच्या दहशतवादी कारवाया अधूनमधून सुरूच असतात. पाकिस्तानाही या अतिरेक्यांचे कारनामे सुरू असतात. पाकिस्तानातील सुन्नी विरूद्ध शिया पंथीयांच्या वादात स्थलांतरीत हजारांना नेहमीच लक्ष्य केले जात असून आजतागायत शेकडोंना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या विशिष्ट शारिरीक ठेवणीतून ते चटकन ओळखू येतात. त्यामुळेही मारेकऱ्यांचे ते सहज सावज ठरतात. स्थानिक विरूद्ध स्थलांतरीत अशीही एक वादाची किनार या प्रकरणाला आहे. स्थलांतर करूनही पाकिस्तानही ते सुरक्षित नसल्याचे त्यांच्यावर वारंवार होणाऱ्या जीवघेण्या हल्लयातून स्पष्ट झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -