घरदेश-विदेशED : भाजपा नेत्यांविरोधात ईडी कारवाई का नाही? गृहमंत्री अमित शाह यांनी...

ED : भाजपा नेत्यांविरोधात ईडी कारवाई का नाही? गृहमंत्री अमित शाह यांनी थेटच सांगितले

Subscribe

नवी दिल्ली : भाजपच्या नेत्यांवर ईडी कारवाई करत नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. याउलट मोदी सरकार आल्यानंतर काळा पैसा हद्दपार करण्यासाठी काम केलं जात आहे. ईडीने ज्या काही संपत्ती आणि मालमत्ता जप्त केल्या आहे, त्यामध्ये राजकीय पक्षाशी संबंधित केवळ 5 टक्के नेत्यांची संपत्ती आहे. उरलेली 95 टक्के संपत्ती ही काळा पैसा जमा करणाऱ्यांची आहे.

ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील नेत्याच्या घरी कारवाई झाली तेव्हा 55 कोटी रुपये सापडले. काँग्रेस नेत्याच्या घरी 155 कोटी संपत्ती सापडली. एसबीआय बँकचे कर्मचारी पैसे मोजून मोजून थकले, मशीन गरम झाल्या. जर नेत्यांच्या घरातून कोट्यवधी सापडत असतील ते कुठून आले. जनतेला हे सगळे दिसत नाही का? पैसे भरण्यासाठी टेम्पोच्या टेम्पो आणावे लागतात. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा काँग्रेसच्या घरातून कोट्यवधी रुपये सापडतात याबद्दल राहुल गांधी यांनी बोलावे असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. भाजपा नेत्यांविरोधात ईडी कारवाई करत नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चेत ते सहभागी झाले होते, तेव्हा त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

अमित शाह म्हणाले, ‘राजकीय नेत्यांविरोधात कारवाईच होऊ नये, असे विरोधकांना वाटते. मात्र मी स्‍पष्‍टपणे सांगू इच्छितो की, 95 टक्के कारवाया अशा लोकांविरोधात झाल्या आहेत, ज्यांचा राजकारणाशी काही संबंधच नाही.’ यावेळी शाह यांनी ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याच्या घरावर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. शाह म्हणाले, “छाप्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. उलट प्रश्न असा आहे की, काँग्रेसच्या खासदाराकडे 350 कोटी आणि ममता बॅनर्जींच्या मंत्र्याकडे 55 कोटी रुपये आले कुठून? नोटांचे बंडल भरण्यासाठी मॅटाडोर आणावा लागला. तो कमी पडला म्हणून पहाटे 4 वाजता नोटा भरण्यासाठी दुसरा मॅटाडोर आणावा लागला. हा पैसा कुठे जाणार होता, हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी देशातील जनतेला सांगू शकतील का? एवढेच नाही, तर त्यांच्या खासदाराच्या घरातून जप्त करण्यात आलेले 355 कोटी रुपये कुणाचे आहेत? याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे,” असेही शाह यावेळी म्हणाले.

भाजपच्या नेत्यांवर कारवाई का नाही?

भाजप नेत्यांवर कारवाई होत नाही, असे त्यांना म्हटल्यावर शाह म्हणाले की तुम्ही कोर्टात जा. आम्ही विरोधक होतो तेव्हा जनहित याचिका दाखल केल्या होत्या. 82 पीआयएल केले होते, त्यापैकी 35 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. तुमच्या सरकारने गुन्हे दाखल केले होते. जर हिंमत असेल तर कोर्टामध्ये जा. 1200 कोटींचा घोटाळा करणारी इंडिया आघाडी चुकीची माहिती देत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर आजपर्यंत कुणीही 25 पैसे घोटाळा केल्याचा आरोप करू शकत नाही’ असंही शहांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे कारवाई करत नाही, हे म्हणण्यात काही अर्थ करत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -