घरट्रेंडिंगमेडिकल ऑक्सिजन लिक्विड रूपात का असतो? मेडिकल ऑक्सिजन निर्मितीबाबत सर्वकाही...

मेडिकल ऑक्सिजन लिक्विड रूपात का असतो? मेडिकल ऑक्सिजन निर्मितीबाबत सर्वकाही…

Subscribe

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची आवश्यकता असते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल्स म्हणजेच ऑक्सिजनचे रेणू फुफ्फुसांपर्यंत आणि त्याद्वारे आपल्या रक्तप्रवाहात जातात. कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या उपचारांमध्ये ऑक्सिजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण या संसर्गामुळे फुफ्फुसांच्या कामकाजावर परिणाम होतो. धाप लागणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे ही गंभीर कोविड-19 रुग्णांमधील नेहमी दिसणारी सर्वसामान्य लक्षणे आहेत. यामुळे शरीरातील विविध भागांना होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर देखील विपरित परिणाम होतो. म्हणूनच या रुग्णांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ऑक्सिजन उपचारांची गरज लागते.

म्हणून मेडिकल ऑक्सिजन लिक्विड रूपात असतो

वैद्यकीय ऑक्सिजन वितरित करण्याचा एक मार्ग म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा अति जास्त शुद्धतेचा ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन पुरवण्याच्या विविध प्रकारांपैकी एक म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असून जो मानवी शरीरामध्ये वापर करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात येते. अतिशय अल्प वितळण आणि उत्कलन बिंदू म्हणजे उकळण्याचे तापमानासारखे असल्याने सामान्य तापमानाला ऑक्सिजन वायूरुपात असतो. मात्र तो लिक्विड स्वरूपात असल्याने त्याची जास्त प्रमाणात साठवणूक करणे आणि वाहतूक करणे सोपे होते.

- Advertisement -

 

- Advertisement -

अशा प्रकारे केली जाते निर्मिती

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन बनवण्याचे बरेच प्रकार आहेत. मात्र, सर्वसामान्यपणे वापरली जाणारी पद्धत म्हणजे वायूंच्या मिश्रणातून ऑक्सिजन वेगळा करणे आणि त्यासाठी एयर सेपरेशन युनिट्स (ASUs) किंवा एएसयू वापरले जातात. एएसयू म्हणजे मोठ्या प्रमाणात वायूंना परस्परांपासून वेगळे करणारी प्लांट्स म्हणजेच संयंत्रे असतात. या संयत्रांमध्ये वातावरणात असलेल्या हवेमधून ऑक्सिजन वेगळा करण्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड म्हणजेच अंशतः उर्ध्वपतन पद्धतीचा वापर केला जातो. वातावरणातील हवेमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन आणि ऑक्सिजन वायू असतात आणि त्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण ७८ टक्के तर ऑक्सिजनचे प्रमाण २१ टक्के असतात उर्वरित १ टक्के भागात अरगॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन, हेलिअम आणि हायड्रोजन वायू असतात.

फ्रॅक्शन डिस्टिलेशन प्रक्रिया म्हणजे…

या पद्धतीमध्ये हवेतील विविध वायूंना अतिशय जास्त थंड करून त्यांचे द्रवरुपात रुपांतर करून विविध घटकांमध्ये वेगळे केले जाते आणि त्यातून द्रवरुप ऑक्सिजन वेगळा केला जातो. सर्वप्रथम वातावरणातील हवा -१८१°C अंश सेल्सियस तापमानापर्यंत थंड केली जाते. या तापमानाला ऑक्सिजनचे द्रवात रुपांतर होते. नायट्रोजनचा उत्कलन बिंदू -१९६°C अंश सेल्सियस असल्याने तो वायूरुपातच राहातो. मात्र, अरगॉनचा उत्कलन बिंदू ऑक्सिजन प्रमाणेच (–१८६°C) आहे आणि त्यामुळे अरगॉन बऱ्याच जास्त प्रमाणात ऑक्सिजनसोबत द्रवात रुपांतरित होतो.

या प्रक्रियेतून मिळणारे ऑक्सिजन आणि अरगॉनचे मिश्रण बाहेर सोडले जाते, त्यावरील दाब कमी केला जातो आणि दुसऱ्या एका कमी दाब असलेल्या डिस्टिलेशन पात्रामधून त्याला अधिक शुद्ध करण्यासाठी पाठवले जाते. या प्रक्रियेनंतर आपल्याला अतिशय शुद्ध ऑक्सिजन मिळतो आणि हा शुद्ध ऑक्सिजन क्रायोजेनिक कंटेनरमध्ये भरून वाहतुकीसाठी पाठवला जातो.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -