घरदेश-विदेशएम. जे. अकबरांच्या राजीनाम्याची 'आतली बातमी'

एम. जे. अकबरांच्या राजीनाम्याची ‘आतली बातमी’

Subscribe

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या लौगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना अखेर पायउतार व्हावे लागले आहे. कायदेशीर कारवाई लढून आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करू असे अकबर बोलत असले तरी, आतमी बातमी मात्र वेगळीच आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेले एम. जे. अकबर यांच्यावर आत्तापर्यंत २० महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. तनुश्री दत्ता – नाना पाटेकर प्रकरणानंतर #Me Too चळवळ सध्या जोरात सुरू आहे. आत्तापर्यंत अनेक दिग्गजांवर यासंदर्भातील आरोप झाले आहेत. त्यात एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपानंतर सरकार समोरच्या अडचणी वाढल्या. एका बाजुला सरकार बेटी बचाओ, बेटी बढाओ अशा घोषणा देते आणि दुसऱ्या बाजुला लैंगिक शोषणाचे आरोप असलेले मंत्री असणे म्हणजे सरकारची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट आहे. त्यामुळे एम. जे. अकबर यांनी अखेर पायउतार व्हावे लागले. आपल्यावरील आरोप हे खोटे आहेत. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपण राजीनामा दिल्याचे एम. जे. अकबर यांनी स्पष्ट केले आहे. पण त्यांच्या राजीनाम्याच्या आतमी बातमी मात्र वेगळीच आहे.

काय आहे ‘आतली बातमी’

एम. जे. अकबर यांच्यामागे मोठा असा जनाधार नाही. शिवाय, अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे हिंदी भाषिक प्रदेशामध्ये आगामी निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्याच मुद्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील एम. जे. अकबर त्यानंतर अमित शहा यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील एम. जे. अकबर यांच्यावर नाराज असल्याची माहिती आता पुढे येत आहे. दुसरीकडे शबरीमाला मंदिर प्रवेशाचा मुद्दा देखील सध्या गाजत आहे. या सर्व घडामोडींवर एम. जे. अकबर यांच्यावर होणारे आरोप भाजपची डोकेदुखी वाढवणारी ठरणारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर देखील परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता एम. जे. एकबर यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -