घरदेश-विदेशश्रीमंतांच्या गाडीत ८ एअरबॅग, मग सर्वसामान्यांच्या तीनच का? कार निर्मात्या कंपन्यांना गडकरींचा...

श्रीमंतांच्या गाडीत ८ एअरबॅग, मग सर्वसामान्यांच्या तीनच का? कार निर्मात्या कंपन्यांना गडकरींचा परखड सवाल

Subscribe

श्रीमंतांसाठी गाडीत ८ एअरबॅग देता, मग स्वस्त सर्वसामान्य नागरिक वापरतात अशा कारमध्ये फक्त २-३ एअरबॅगच का देता? असा परखड सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कार निर्मात्या कंपन्यांना विचारला आहे. नितीन गडकरी एका मुलाखतीत बोलत होते.

कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या केवळ श्रीमंतांच्या महागड्या कार्समध्ये आठ एअरबॅग्स देतात. मात्र सर्वसामान्य नागरिक परवडणाऱ्या लहान कार खरेदी करतात. या कारमध्ये केवळ दोनचं एअरबॅग्स असतात. असे म्हणत नितीन गडकरी निर्मात्या कंपन्यांना धारेवर धरत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यावर बोलताना गडकरांनी लहान कारमध्येही पुरेशा एअरबॅग द्याव्यात अशा सूचना कार निर्मिती कंपन्यांना केल्या आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिक लहान इकोनॉमिक कार विकत घेतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी कारमध्येही पुरेशा एअरबॅग नसल्याने अपघात झाल्यास त्यांना आपला जीव गमवावा लागू शकतो. असे म्हणत त्यांनी सर्व कार उत्पादकांना आवाहन केले की, वाहनांच्या सर्व वेरिंयट आणि सेगमेंटमध्ये किमान ६ एअरबॅग दिल्या जाव्यात. जेणेकरुन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित प्रवास करु शकतात.

एअरबॅगची संख्या वाढली तर कारची किंमत प्रति एअरबॅगमागे ३००० ते ४००० रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघातातून देशातील गरिब नागरिकांचे संरक्षण झाले पाहिजे. असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -