घरदेश-विदेश'त्या'बाबत पंतप्रधानांकडून पुरावे का मागवले नाहीत? सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न

‘त्या’बाबत पंतप्रधानांकडून पुरावे का मागवले नाहीत? सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Subscribe

कपिल सिब्बल म्हणाले की, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसवर केलेल्या आरोपावर पुरावे मागवले पाहिजेत. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस हा एक असा पक्ष आहे ज्याने मागच्या दाराने दहशतवादाला समर्थन दिलं आहे.

राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवरुन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. कपिल सिब्बल म्हणाले की, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसवर केलेल्या आरोपावर पुरावे मागवले पाहिजेत. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस हा एक असा पक्ष आहे ज्याने मागच्या दाराने दहशतवादाला समर्थन दिलं आहे.( Why was evidence not sought from the Prime Minister Narendra Modi on the allegations against the Congress Kapil Sibal s question to Election Commission )

भारतीय जनता पक्षावर (भाजप) एका जाहिरातीत लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून पुरावे मागितल्यानंतर सिब्बल यांनी ही टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

भाजपच्या विरोधात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘भ्रष्टाचार दर कार्ड’ जाहिरातीवरून निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या कर्नाटक युनिटला नोटीस बजावली आहे आणि पक्षाला आरोप सिद्ध करण्यासाठी रविवारी संध्याकाळपर्यंत ‘ठोस पुरावे’ देण्यास सांगितले आहेत. भाजपने तक्रार केल्यानंतर शनिवारी ही नोटीस बजावण्यात आली होती.

सिब्बल यांनी या घडामोडीबाबत ट्विट केले की, ‘भाजपवर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने काँग्रेसकडून पुरावे मागवले आहेत. काँग्रेसने दहशतवादाशी संबंधितांशी मागच्या दरवाजाने चर्चा केल्याचा आरोप करत पंतप्रधानांकडे पुरावे का मागितले जात नाहीत ? असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

समाजवादी पक्षाच्या (एसपी) पाठिंब्याने राज्यसभेचे स्वतंत्र सदस्य म्हणून निवडून आलेले सिब्बल यांनी पुढे लिहिले की, निवडणूक आयोगाकडे पंतप्रधानांना पुरावे मागण्याची हिंमत नाही का?

( हेही वाचा: पुलवामात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 5 किलो IEDसह एकाला अटक )

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) नेतृत्वाखालील पहिल्या आणि दुसऱ्या सरकारमध्ये सिब्बल हे केंद्रीय मंत्री होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसने शनिवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून ‘व्होट बँकेसाठी काँग्रेसने दहशतवादाला आश्रय दिला’ या पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -