यशवंत सिन्हांचं राष्ट्रपतीपद का हुकलं? मुर्मूंना पाठिंबा कसा वाढला, वाचा एका क्लिकवर

या निवडणुकीत यशवंत सिन्हा बऱ्याच फरकाने हरले. ते अशा पद्धतीने हरतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यांच्या राज्यातही त्यांना मुर्मू यांच्यापेक्षा कमी मतं मिळाली आहेत.

yashwant sinha and draupadi murmu

ओदिसातील रहिवासी असलेल्या आणि झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या भारताच्या नव्या राष्ट्रपती बनल्या आहेत. काल झालेल्या मतमोजणीतून हा निकाल जाहीर झाला असून २४ जुलै रोजी त्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. दरम्यान, यावेळेस राष्ट्रपती पदाची निवडणूक अगदी सहज पार पडली. द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात युपीएने यशवंत सिन्हा उभे ठाकले होते. मात्र, द्रौपदी मुर्मू यांचं उमेदवारीसाठी नाव जाहीर होताच देशभरातून त्यांना पाठिंबा जाहीर झाला होता. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी होती. दरम्यान, युपीएच्या उमेदवारीसाठी सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत होतं. त्यासाठी युपीएच्या नेत्यांचीही बैठक झाली. मात्र, या पदासाठी शरद पवार यांनीच नकार दिला आणि युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत यशवंत सिन्हा बऱ्याच फरकाने हरले. ते अशा पद्धतीने हरतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यांच्या राज्यातही त्यांना मुर्मू यांच्यापेक्षा कमी मतं मिळाली आहेत. (Why Yashwant Sinha lost president election in front of Draupadi Murmu)

हेही वाचा – राष्ट्रपतीपदाची निवडणूक : महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मूंना मिळाली १८१ मते

राष्ट्रपती पदासाठी ४ हजार ७४५ खासदार आणि आमदारांनी मतदान केले. यांचं मतमुल्य १० लाख ७२ हजार ३७७ आहे. यापैकी २ हजार ८२४ सदस्यांनी द्रौपदी मुर्मू यांना मत दिले. त्यांचं मतमुल्य ६ लाख ७६ हजार ८०३ आहे. तर, यशवंतसिन्हा यांना १८७७ मते पडली.

मध्य प्रदेश, पंजाबमधील पाच मते बाद करण्यात आली होती. तर, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीतील प्रत्येकी चार, उत्तर प्रदेशचे तीन, बिहारचे दोन, हिमाचल प्रदेश, झारखंड, मेघालय, तमिळनाडू, तेलंगाना, उत्तराखंड आणि पुदुच्चेरी येथील प्रत्येकी १ मत बाद ठरले.

हेही वाचा – उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस राहणार तटस्थ, सरचिटणीस अभिषेक बनर्जींनी केली घोषणा

स्वतःच्या राज्यातही मते कमी

यशवंत सिन्हा हे बिहारचे आहेत. असं असूनही त्यांना बिहारमध्ये द्रौपदी मुर्मू यांच्यापेक्षा कमी मते मिळाली. यशवंत सिन्हा १०६ मते मिळाली तर मुर्मू यांना १३३ मते मिळाली. द्रौपदी मुर्मू या ओदिसातील असून त्यांना तेथे १३७ मते मिळाली तर सिन्हा यांना नऊ मते मिळाली.

क्रॉस व्होटिंगमुळे मुर्मू जिंकल्या?

राष्ट्रपती निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. आसाममध्ये सर्वाधिक क्रॉस व्होटिंग झालं आहे. तिथे एकूण १२६ आमदारांपैकी ७९ आमदर एनडीएचे आहेत. मात्र, तरीही द्रौपदी मुर्मू यांना १०४ मते मिळाली. १० राज्यांमध्ये ११० आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच, १७ खासदारांनीही आपल्या पक्षाविरोधात जाऊन मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला. १७ खासदारांमुळे द्रौपदी मुर्मू यांच्या मतमूल्यात १२ हजारांची भर पडली.

यशवंत सिन्हा का हरले?

सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीच्या शर्यतीत आघाडीवर होत्या. मात्र, यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू यांच्यात चुरस होण्याची शक्यता होती. परंतु, युपीएतील अंतर्गत वादामुळे यशवंत सिन्हा यांना मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली. यशवंत सिन्हा आता तृणमूल काँग्रेसमध्ये असले तरीही कधीकाळी ते भाजपचे प्रसिद्ध नेते होते. ते सामान्य कुटुंबात येत असले तरीही द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आहे. त्यामुळे विरोधकांतील काही खासदार आणि आमदारांनी मुर्मूंना मतदान केले. जेणेकरून येत्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला असे सांगून मते मिळवता येतील.

काँग्रेस, टीएमसी, एनसीपीसह अनेक विरोधी पक्षांचे नेते यशवंत सिन्हांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आले होते. मात्र, हे नेते आपल्या खासदार आणि आमदारांचं मन वळवू शकले नाहीत. मुलायम सिंह यादव यांच्याविरोधातील सिन्हा यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिपही उत्तर प्रदेशात व्हायरल झाली होती. ज्यामध्ये मुलायम सिंह यादव आयएसआयचे एजेंट असल्याचं म्हटलं होतं. म्हणूनच सपा नेत्यांनी सिन्हांना मतदान केलं आहे.