घरदेश-विदेशपत्नीने विश्वासघात केल्याने पतीची विष पिऊन आत्महत्या

पत्नीने विश्वासघात केल्याने पतीची विष पिऊन आत्महत्या

Subscribe

मध्य प्रदेशात एका व्यक्तीने पत्नीच्या विश्वासघातामुळे दुःखी होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीने एक व्हिडीओ शूट केला होता. त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. व्हीडिओ शूट करून त्या व्यक्तीने भावोजींना तो व्हीडिओ पाठवला. आत्महत्येसाठी त्याने पत्नीसह इतर पाच जणांवर आरोप केले आहेत.

पैसे असेपर्यंत ते पती-पत्नीप्रमाणे राहिले

- Advertisement -

पोलीस अधिकारी केके खनेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमाकलमध्ये राहणारे तुलसीदास पटेल (वय २८) यांनी त्यांची पत्नी लीलावतीच्या विश्वासघातामुळे २५ मे रोजी तिच्याच समोर विष पिऊन आत्महत्या केली. लीलावती डॉक्टर असून तिचे स्वतःचे क्लिनिक आहे. तुलसीदासने लीलावतीशी १९ एप्रिल रोजी लग्न केले होते. लग्नानंतर लीलावतीने तुलसीदासला संपूर्ण इस्टेट विकायला लावली. इस्टेट विकून आलेले पैसै लीलावतीने तिच्या क्लिनिकच्या कामासाठी वापरले. तुलसीदासकडे पैसा असेपर्यंत ते दोघे पती-पत्नीप्रमाणे राहिले पण नंतर लीलावतीच्या वागणुकीत बदल झाला.

बायकोसमोर विष पिऊन केली आत्महत्या

- Advertisement -

तुलसीदासकडील सगळे पैसे संपल्यावर लीलावतीने दुसऱ्या तरूणाशी मैत्री केली. आत्महत्या करायच्या तीन दिवस आधी तुलसीदासला लीलावती तिच्या मित्राबरोबर घरात दिसली. त्यावेळी त्या तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वादानंतर लीलावतीने तुलसीदासला घराबाहेर काढले. पत्नीच्या विश्वासघातामुळे दुखावलेल्या तुलसीदासने शेतात जाऊन एक व्हीडिओ तयार केला व तो भावोजींना पाठवला. २५ मे रोजी तुलसीदासने लीलावतीसमोरच विष पिऊन आत्महत्या केली.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -