छत्तीसगडमध्ये इरफान खानचा ‘ब्लॅकमेल’! पत्नीला बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं अन्…

विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. पती किंवा पत्नीने विश्वासघात केल्यास जोडीदाराकडून टोकाची पावलं उचलली जातात. कधी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं तर कधी जोडीदाराची हत्या केली जाते. पण छत्तीसगडमध्ये विवाह्यबाह्य संबंधात एक अनोखा प्रकार घडला आहे. ज्यात, पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडल्यावरही पतीने पत्नीला कोणतीही शिक्षा न करता एक वेगळीच मागणी केली. या प्रकरणात नेमकं काय घडलं हे कळल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

छत्तीसगडमध्ये एक जोडपं राहतं. परंतु, पत्नीचे विवाह्यबाह्य संबंध होते. एकदा पतीने आपल्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बेडवर आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. पतीने आपल्याला रंगेहात पकडल्याने पत्नीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आता आपल्याला कठोरातील कठोर शिक्षा होणार हे पत्नीला माहीत होतं. पण, कोणताही राग किंवा द्वेष न दाखवता पतीने पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडकडे वेगळीच मागणी केली. ही मागणी एकून दोघेही अवाक् झाले.

पतीने पत्नीच्या विवाह्यबाह्य संबंधाला अजिबात विरोध केला नाही. माझा तुमच्या प्रेमप्रकरणाला विरोध नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. मात्र, त्याआधी तुम्हाला माझी एक मागणी पूर्ण करावी लागेल, असं पती म्हणाला. त्यामुळे त्याची पत्नीही चकीत झाली. तो नक्की काय मागणार हे त्या दोघांनाही ठावूक नव्हतं.

हे प्रेमप्रकरण असंच सुरू ठेवायचं असेल तर याबाबत कुठेही वाश्चता करायची नसेल तर दहा लाख रुपये द्या, अशी मागणी पतीने पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून केली. हे प्रकरण लपवण्यासाठी अखेर पत्नीच्या बॉयफ्रेंडनेही तडजोड करायला तयारी दाखवली. पण एवढ्यावरच थांबेल तो पती कसला? पत्नीचा बॉयफ्रेंड दहा लाख रुपये द्यायला तयार झाल्यानंतरही पतीने पोलीस ठाणे गाठले. संबंधित युवकाने पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार पतीने दाखल केली. हा प्रकार बॉयफ्रेंडला कळल्यावर त्यानेही पोलीस ठाणे गाठले. गर्लफ्रेंडच्या नवऱ्याने माझ्याकडून दहा लाखांची खंडणी उकळली असल्याची त्याने उलट तक्रार दाखल केली. म्हणजेच, आता एका तरुणीसाठी तिचा पती आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधातही तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.