घरदेश-विदेशपती भीक मागत असला तरी पत्नीला पोटगी द्यावीच लागेल; पंजाब आणि हरियाणा...

पती भीक मागत असला तरी पत्नीला पोटगी द्यावीच लागेल; पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा निर्वाळा

Subscribe

नवी दिल्लीः पती भीक मागत असला तरी त्याला पत्नीला पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

एका जोडप्याचा घटस्फोट झाला. पत्नीने पतीकडे महिना पाच हजार रुपये पोटगी मागितली. यास पतीने नकार दिला. माझे उत्पन्न कमी आहे. मी पोटगी देऊ शकत नाही. तसेच पत्नी नोकरी करते. तरी ती पोटगी मागते, असा दावा पतीने केला. मात्र न्यायालयाने पतीचे म्हणणे फेटाळून लावले. पती दररोज पाचशे रुपये कमावतो. मग त्याला महिना पाच हजार रुपये देण्यात काहीच हरकत नाही. तसेच पती भीक मागत असला तरी त्याला पोटगी द्यावीच लागेल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

- Advertisement -

घटस्फाेट झाल्यानंतर पत्नी पोटगीस पात्र असते. पत्नीने किती पोटगी मागावी व पतीने किती द्यावी याचा निर्णय न्यायालय करते. पतीचे उत्पन्न. त्याचे राहणीमान. पत्नीचे राहणीमान. तिचा दैनंदिन खर्च, या निकषावर पोटगीची रक्कम ठरते. पोटगी एक रक्कमी दिली जाते किंवा दरमहाही दिली जाते.

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमाचा नुकताच घटस्फोट झाला आहे. कोलकाता न्यायालयाने मोहम्मद शमी याला पत्नी हसीन जहाँला दरमहा तब्बल १ लाख ३० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शमीची पत्नी हसीन हिने पोटगीसाठी २०१८ मध्ये कोर्टात केस दाखल करत तब्बल १० लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी केली होती. यातील ७ लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित तीन लाख रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील असे कोर्टाला सांगितले होते. दरम्यान, मोहम्मद शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये जास्त होते. त्यानुसार या पोटगीची मागणी करण्यात आली, अशी माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली. शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. त्या आधारावर पोटगीची रक्कम ठरली. तसेच अभिनेता ह्रतिक रोशनने घटस्फोट घेताना पत्नीला कोट्यवधी रुपये दिले असल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -