घरदेश-विदेशपत्नीची हत्या करुन तु्कडे श्वानाला खायला टाकले; झारखंडमधील धक्कादायक प्रकार

पत्नीची हत्या करुन तु्कडे श्वानाला खायला टाकले; झारखंडमधील धक्कादायक प्रकार

Subscribe

२२ वर्षीय रबिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलदारला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी सुरु आहे. त्याने ही हत्या का केली. त्याच्यासोबत अजून कोणी होते का. या हत्सेसाठी हत्यार कुठू आणले, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र याप्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला तत्काळ शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

झारखंडः श्रद्धा वालकर हत्येचे प्रकरण ताजे असतानाच झारखंड येथे झालेल्या एका हत्येने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले व ते श्वानाला खायला घातले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दिलदार असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. रबिकासोबत त्याचा विवाह झाला. हा त्याचा दुसरा विवाह होता. सुरुवातीचे काही दिवस आनंदी होते. नंतर त्यांच्यात वाद सुरु झाला. सतत भांडणं सुरु झाली. रागाच्या भरात दिलदारने रबिकाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे श्वानांना खायला घातले. झारखंडमधील साहिबगंज येथे राहणाऱ्या बोरिया संथालीमधील अंगणवाडी केंद्राच्या मागील जागेत मानवी शरीराचे तुकडे श्वान खात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी हा परिसर सिल करुन तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

२२ वर्षीय रबिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलदारला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी सुरु आहे. त्याने ही हत्या का केली. त्याच्यासोबत अजून कोणी होते का. या हत्सेसाठी हत्यार कुठू आणले, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र याप्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला तत्काळ शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

श्रद्धा वालकरच्या हत्येने सर्वांनाच हादरा बसला. लिव्ह ईनमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची तिचा प्रियकर आफताबने हत्या केली व तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकले. पोलिसांकडे त्याने तशी कबुलीही दिली. तसेच श्रद्धाच्या शरीराचे तुकडे व हत्येसाठी वापलेले हत्यार शोधून दाखवण्याचे आवाहनही आफताबने दिल्ली पोलिसांना केले आहे.

- Advertisement -

याचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आफताबची नार्को व पाॅलिग्राफ चाचणी केली. त्यात त्याने श्रद्धाची हत्या केल्याचे कबुल केले. अशा पद्धतीने अधिक तपासासाठी पोलीस दिलदारचीही नार्को व पाॅलिग्राफ चाचणी करु शकतात. मात्र या दोन्ही चाचण्यांमध्ये आरोपीने दिलेला जबाब न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येत नाही. या कबुली जबाबाच्या मदतीने पोलीस पुरावे शोधतात.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -