प्रेमात अडथळा होणाऱ्या पतीला शॉक देऊन पत्नीने केली हत्या!

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

The man murder of his wife for three hundred rupees in beed
बीडमध्ये ३०० रुपयांच्या हिशेबावरुन वाद

यूपीमधील गाझियाबादच्या पोलिस स्टेशन निवारी भागात पुन्हा एकदा पती-पत्नीमधील संबंधामुळे हत्येचे प्रकरण उघडकीस आलं आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीला ठार मारले. पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या ठाणे निवारी परिसरातील मकरमतपूर शिखेरा गावात शेतात १७ जूनला एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रहस्यमय परिस्थितीत सापडला. पोलिसांनी जे सांगितले ते धक्कादायक होते कारण त्या व्यक्तीने आपल्या प्रियकरासह इलेक्ट्रोक्युशनद्वारे पतीची हत्या केली होती. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत मृताचे कोणाशीही भांडण किंवा शत्रुत्व नसल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे मृताच्या शरीरावर जखमा दिसल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. यावर पोलिसांनाही थोडासा संशय आला आणि पोलिस संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. नरेशला पंधरा वर्षे, १६ वर्षे आणि १७ वर्षाची तीन मुलं आहेत. नरेशची हत्या केल्याचा संशय या कुटूंबावर होता आणि त्याने पोलिस ठाण्यात हत्येची तक्रार देखील केली होती.  त्या आधारे याचा तपास केला असता नरेशची पत्नी सोनिया आणि शेजारच्या रहिवासी असलेल्या जॉनी या युवकांमध्ये प्रेम प्रकरण असल्याचे आढळले.

नरेशला आपल्या पत्नीचे बाजूच्या जॉनी बरोबर प्रेमप्रकरण असल्याचं समजलं होतं. त्यामुळे पत्नीने नरेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने नरेशला शेतात घेऊन जात विद्युत प्रवाहसोडून मारले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.


हे ही वाचा – बलात्काराची शिक्षा भोगून परत आलेल्या बापाने केला मुलीवरच बलात्कार!