Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Railway Trains: रेल्वे प्रवाशांना खुशखबर! सुरु होतेयं 'ही' सुविधा

Railway Trains: रेल्वे प्रवाशांना खुशखबर! सुरु होतेयं ‘ही’ सुविधा

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना विना अडथळा मनोरंजनासाठी फ्री वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबई लोकलसह मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये कंटेंट ऑन डिमांड’ अंतर्गत वायफाय सेवा पुरवली जाणार आहे. यासंदर्भात रेलटेलने निर्णय घेतला आहे. यामुळे धावत्या लोकलमध्येही प्रवाशांना आता विना अडथळा मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.
भारतीय रेल्वे स्मार्ट रेल्वे बनवण्यासाठी अनेक नवनवीन बदल केले जात आहे.त्यामुळे आता रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना कंटेंट ऑन डिमांड अतंर्गत सर्फिंग, माहितीपट, चित्रपट, संगीत, गाण्यांचा अनुभव घेता येणार आहे.

तसेच टप्याटप्याने अनेक भाषांमध्ये मनोरंजनाचा पर्याय प्रवशांना उपलब्ध होतील अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात १० ते १२ लोकल गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई लोकल, प्रीमियम- मेल- एक्सप्रेसचा समावेश आहे. याचबरोबर चेन्नई एक्स्प्रेसमध्ये देखील या प्रकारच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल.या प्रकल्पाची अंमलबजवणीची जबाबदारी रेलटेलकडे असणार आहे. रेल्वे आणि रेल्वे स्थानकात कंटेंट ऑन डिमांड सेवा देण्यासाठी रेलटेलने मार्गो कंपनीशी करार केला आहे. बहुभाषक माहिती मोफत आणि पैसे देऊन अशा दोन्ही प्रकारात सेवा उपलब्ध असेल, असेही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा- उत्तर प्रदेशात चाट दुकानदार झाला ‘आईन्स्टाईन’, व्हिडिओ तुफान व्हायरल

- Advertisement -

 

 

- Advertisement -