घरताज्या घडामोडीExit Pollsमुळे गोवा भाजपात खळबळ, मुख्यमंत्री सावंत थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला; म्हणाले...

Exit Pollsमुळे गोवा भाजपात खळबळ, मुख्यमंत्री सावंत थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला; म्हणाले…

Subscribe

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार १९ जागांसह भाजपा हा गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असणार आहे. काँग्रेसला १४+ जागा मिळण्याची शक्यता आहे.

एग्झिट पोल समोर आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यात स्पष्ट बहुमताचा दावा केला. शिवाय त्यांनी पुन्हा एकदा राज्याची कमान आपल्या हाती सोपवली जाणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी आलेल्या एग्झिट पोलमध्ये गोव्यात भाजपचे सरकार पुन्हा एकदा येणार असल्याचे दिसत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेशी बातचित करताना आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, ‘भाजप २० हून अधिक जागा जिंकणार आहे. जास्त करून एग्झिट पोल भाजपला जिंकवताना दिसत आहे. आम्ही अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांना पाठिंबाने सरकार बनवू. केंद्रीय नेतृत्व पक्षासोबत त्यांच्या मागणीबाबत संपर्कात आहेत. जर गरज पडली तर आम्ही एमजीपीकडून पाठिंबा मागू.’

- Advertisement -

पुढे प्रमोद सावंत म्हणाले की, ‘मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. यादरम्यान निवडणुकीबाबत चर्चा झाली. आम्ही जास्तीत जास्त जागा मिळवून सरकार बनवणार आहोत. मला असे वाटते की, मला पक्षाची सेवा (मुख्यमंत्री म्हणून) करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळेल. भाजप जे बोलते ते करते. भाजपने आता हे म्हटले आहे, त्यामुळे हे नक्की होईल.’

- Advertisement -

एग्झिट पोल काय सांगतो?

इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार १९ जागांसह भाजपा हा गोव्यातील सर्वात मोठा पक्ष असणार आहे. काँग्रेसला १४+ जागा मिळण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसला दोन आणि आम आदमी पार्टीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इतर ५ जागा जिंकू शकतात.


हेही वाचा – Poll of Exit polls: यूपीसह ५ राज्यांमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार?, जाणून घ्या काय आहेत पाच एजन्सीचे एक्झिट पोल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -