घरटेक-वेकतुमच्या कॉम्प्युटरमधील Google Chrome होणार बंद; जाणून घ्या कारण

तुमच्या कॉम्प्युटरमधील Google Chrome होणार बंद; जाणून घ्या कारण

Subscribe

नवी दिल्ली : गुगल क्रोम हे आज सर्वधिक वापरले जाणारे वेब ब्राऊजर आहे. विंडोज युजर्स आपल्या कॉम्प्युटरवर आणि Android युजर्सना स्मार्टफोनमध्ये हे ब्राऊजर वापरण्यास पसंती देतात. पण गुगल आता विंडोजच्या काही व्हर्जनमध्ये आपल्या ब्राउझरला सपोर्ट करणं बंद करणार आहेत. कंपनीने स्वत: यासंदर्भात घोषणा केली आहे.

कोणत्या विंडोजवर Google Chrome होणार बंद?

Google ने आपल्या सपोर्ट पेजच्या माध्यमातून घोषणा केली की, पुढील वर्षी 2023 मध्ये Windows 7 आणि Windows 8.1 शेवटचे Google Chrome अपडेट देणार आहे. हे अपडेट Google Chrome 110 व्हर्जन नावाने होणार असून ते 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत येऊ शकते. यानंतर कंपनी भविष्यात कोणतेही नवीन अपडेट आणणार नाही. यासोबतच Google Chrome विंडोज 7 आणि 8 वर्जनवरील सपोर्ट बंद करेल.

- Advertisement -

Google ने स्पष्टीकरण दिले की, Crome 110 आल्यानंतर कंपनी अधिकृतपणे मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 आणि विंडोज 8.1 च्या दोन्ही व्हर्जन सपोर्ट देणे बंद करणार आहे. यामुळे युजर्सला जर Crome वापरायचे असेल तर त्यांना आपल्या कॉम्प्युटरवर विंडोजचे नवे व्हर्जन म्हणजे विंडोज 10 आणि 11 अपडेट करावे लागेल.

… तरी Google Chrome राहणार सुरु

गुगलने आपल्या सपोर्ट पेजवर सांगितले की, कंपनी युजर्सच्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनमध्ये सपोर्ट देणं बंद करेल,तसेच त्यांना नवीन अपडेट मिळणार नाही. पण तरीही युजर्स आपल्या कॉम्प्युटरवर गुगल क्रोममध्ये ब्राऊजिंग करू शकतात. कंपनी फक्त या व्हर्जनच्या कॉम्प्युटरवर सपोर्ट बंद करत आहे. ज्यामुळे युजर्सना कोणतेही टेक्निकल सपोर्ट मिळू शकणार नाही. यासह, युजर्स भविष्यात उपलब्ध होणार्‍या Google Chrome च्या नव्या फिचर्स देखील आनंद घेऊ शकणार नाहीत.

- Advertisement -

कॉम्प्युटर असो वा स्मार्टफोन, गुगल क्रोमच्या लोकप्रियतेशी कोणीही टक्कर देऊ शकत नाही. हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर आहे. भारतीय युजर्ससाठीही हा एक विश्वसनीय वेब ब्राउझर आहे.


T20 World Cup 2022: श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये सामन्याचा थरार, संघात ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -