भाजपमध्ये सहभागी होणार का?; काँग्रेस सोडल्यानंतर हार्दिक पटेल म्हणतात…

विशेष म्हणजे हार्दिक पटेल यांनी पंजाब गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येवरून आम आमदी पार्टीवर निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये लिहितात, पंजाबचे मुख्यमंत्री आणि दिल्लीतून आम आदमी पार्टीकडून पंजाब सरकार चालवणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे की, त्यांना काँग्रेससारखेच पंजाबला दुःख देणार दुसरी पार्टी बनायचं आहे.

hardik patel

अहमदाबाद: गेल्या दिवसांपूर्वीच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे काँग्रेस सोडताना त्यांनी पक्षातील नेत्यांवर काही गंभीर आरोपदेखील केले. त्यानंतर हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु माजी काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी सोमवारी भाजपमध्ये सहभागी होण्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. मी भाजपमध्ये सहभागी होत नाहीये, असं काही असेल तर मी तुम्हाला सांगेन, असं हार्दिक पटेल म्हणालेत.

विशेष म्हणजे हार्दिक पटेल यांनी पंजाब गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येवरून आम आमदी पार्टीवर निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये लिहितात, पंजाबचे मुख्यमंत्री आणि दिल्लीतून आम आदमी पार्टीकडून पंजाब सरकार चालवणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे की, त्यांना काँग्रेससारखेच पंजाबला दुःख देणार दुसरी पार्टी बनायचं आहे.

पंजाबचे प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला यांची रविवारी हत्या करण्यात आली. त्यांच्या गाडीवर 30 राऊंड फायर करण्यात आले. ते रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सिद्धू मूसेवाल्याची सुरक्षा शनिवारी पंजाब सरकारनं परत घेतली आहे. सीएम भगवंत मान यांनी कायदा-सुव्यवस्थेचा हवाला देत शनिवारी 424 व्हीआयपीची सुरक्षा काढून घेतली होती, त्यात मूसेवाला यांचाही समावेश होता.

हेही वाचाः Rajya Sabha Elections 2022: शायद मेरी तपस्या में कुछ..,राज्यसभेची उमेदवारी डावलताच काँग्रेस नेत्यानं ट्विट करत व्यक्त केली नाराजी