कोरोना संशयितांना आता १४ नााही तर २८ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवणार

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देश लॉक झाला आहे. छत्तीसगड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संशयितांना आता १४ नाही तर २८ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

isolation ward
कोरोना संशयितांना आता १४ नााही तर २८ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवणार

देशातील कोरोना विषाणुच्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती पावले उचलत आहेत. दरम्यान, कोरोना संशयितांबाबत छत्तीसगड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता छत्तीसगडमध्ये कोरोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगणामधून आलेल्या शेकडो गावकऱ्यांना सुकमा जिल्ह्यात ठेवले आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या मुख्यालयात १०० बेडचे आयसोलेशन केंद्रे तयार केली गेली आहेत. जिथे कोरोना संशयितांना ठेवण्यात येणार आहे. शेजारच्या राज्यात वाढणार्‍या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सुकमा येथे आरोग्य विभागाच्या विशेष पथकाला सतर्क करण्यात आले आहे.


हेही वाचा – Coronavirus:…जर लॉकडाउन नसते तर जगात ४ करोड लोकांचा मृत्यू झाला असता


विशेष म्हणजे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. छत्तीसगड सरकारने मोठा निर्णय घेत कोरोना संशयितांना १४ ऐवजी २८ दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारने कोरोना विषाणुमुळे झालेल्या नवीन मृत्यूंचा खुलासा केला आहे. तेलंगणामध्ये आतापर्यंत कोरोनाने ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे, छत्तीसगड सरकारने म्हटले आहे. कोरोना विषाणुमुळे सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने म्हटले आहे. सर्वजण या महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित कार्यक्रमात पोहोचले होते.