घरदेश-विदेशसमुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मुंबई बुडणार का?; संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी दिली माहिती

समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मुंबई बुडणार का?; संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी दिली माहिती

Subscribe

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हवामानात होणाऱ्या बदलांमुळे जगाला मोठा इशारा दिला आहे. प्रत्येक खंडात असलेल्या मोठ्या शहरांना यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हवामान बदलाबाबत जगाला इशारा दिला आहे. अँटोनियो गुटेरेस यांनी संगितले की, “मुंबई आणि न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांना समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आता जागतिक समुदायाला समुद्रातील वाढत्या पाणीपातळीचा सामना करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरांचे भविष्य संकटात आहे आणि म्हणूनच समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होणे हे धोकादायक आहे.

जगभरातील लहान बेट, विकसनशील राज्ये आणि इतर सखल भागात राहणाऱ्या लाखो लोकांसाठी, ‘समुद्र पातळीत वाढ – आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेवर परिणाम’ या विषयावरील UN सुरक्षा परिषदेच्या चर्चेत गुटेरेस म्हणाले की, समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ हे सर्व देशांसाठी शिकवण आहे. यामुळे सखल भाग असलेल्या देशांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येऊ शकते.

- Advertisement -

गेल्या 3,000 वर्षांतील कोणत्याही मागील शतकाच्या तुलनेत 1900 पासून जागतिक सरासरी समुद्राची पातळी अधिक वेगाने वाढली आहे आणि गेल्या 11,000 वर्षांत गेल्या शतकात जागतिक महासागरात अधिक वेगाने तापमानात वाढ झाली आहे, असे गुटेरेस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे. जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमानवाढ ‘चमत्कारात्मकरीत्या’ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असली तरीही समुद्र पातळीत लक्षणीय वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक खंडातील मोठ्या शहरांना समुद्रातील वाढत्या पाणी पातळीचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. ज्यात कैरो, लागोस, मापुटो, बँकॉक, ढाका, जकार्ता, मुंबई, शांघाय, कोपनहेगन, लंडन, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागो या शहरांचा समावेश आहे. यूएन प्रमुखांनी प्रामुख्याने सांगितले की, कमी उंचीवर किनारी भागात राहणाऱ्या सुमारे 900 दशलक्ष लोकांना याचा सर्वाधिक धोका आहे.

- Advertisement -

वाढत्या समुद्राचे परिणाम आधीच अस्थिरता आणि संघर्षाचे नवीन स्रोत तयार करत आहेत. गुटेरेस यांनी बैठकीत सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने शहरांना असुरक्षित वाटत असणाऱ्या आणि धोकादायक असणाऱ्या या गोष्टीचा सामना केला पाहिजे. विशेषत: समुद्राच्या पाणी पातळीत कोणत्या कारणांमुळे वाढ होते याची सुद्धा दखल घेतली पाहिजे.

हेही वाचा – शिंदेंमुळे नाही, ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं; हरिश साळवेंचा जोरदार युक्तिवाद

“लोक आपली घरे गमावत आहेत. बाधित लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या अत्यावश्यक मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपण कार्य करणे सुरूच ठेवले पाहिजे,” असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांकडून यावेळी सांगण्यात आले. वाढत्या समुद्रामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे. यामध्ये सुरक्षा परिषदेची महत्त्वाची भूमिका आहे. आपण सर्वांनी या महत्त्वाच्या विषयावर बोलणे सुरू ठेवले पाहिजे आणि या संकटाच्या अग्रभागी असलेल्यांचे जीवन, उपजीविका आणि समुदायांना आधार देण्यासाठी कार्य केले पाहिजे,” असे संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -