ढाका : भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासंबंधी बांगलादेशने भारताशी संपर्क केला आहे. बांगलादेश भारताच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे. मात्र, भारताने त्याबाबत अद्याप मौन बाळगले आहे. (will serve note of urgency if india gave no response bangladesh pushes for sheikh hasina extradition)
या सगळ्या घडामोडींदरम्यान बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपण भारताच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताकडून कोणतेही उत्तर न आल्यास याबाबत कठोर निर्णय घेत, नोट ऑफ अर्जन्सी जारी केली जाईल, असेही मंत्रालयाने सांगितले आहे.
भारत आणि बांगलादेश दरम्यान प्रत्यार्पणा संबंधी उत्तर देण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी ठरला नसल्याचे बांगलादेशी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद रफीकुल आलम यांनी सांगितले. मात्र, भारताने यासंदर्भात वेळेवर कोणतेही उत्तर दिले नाही तर आम्ही पुढचे पाऊल उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – New Parliament : नवीन संसद भवनाजवळ आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
एका पत्रकार परिषदेदरम्यान बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद रफीकुल आलम म्हणाले की, भारताला सोमवारी यासंदर्भात सांगण्यात आले. माझ्या माहितीनुसार, अधिकृतरित्या भारताकडून काहीही उत्तर आलेले नाही. आम्ही आता यासंदर्भात काहीही बोलणार नाही. तर भारताच्या उत्तराची वाट पाहू. त्या उत्तरावर आमची पुढची कार्यवाही ठरेल, असेही ते म्हणाले.
प्रत्यार्पण मागणीचे उत्तर देण्यासाठी वेळेची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे आम्हाला भारत सरकारच्या उत्तराची वाट पहावी लागेल. कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहावी लागते. त्यापूर्वी जर आम्हाला उत्तर मिळाले नाही तर आम्ही नोट ऑफ अर्जन्सी पाठवू. तुमच्या उत्तराची आम्ही वाट पहात असल्याचे आम्ही भारताला सांगू, असेही ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच यासंदर्भातील पत्रव्यवहार झाला आहे, त्यामुळे यापुढे काय कार्यवाही केली जाईल, हे सांगणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Air travel rules : नवीन वर्षात विमानप्रवास करत असाल तर, हा नवीन नियम जाणून घ्या!
Edited by : Ashwini A. Bhatavdekar