नवी दिल्ली : सुपरस्टार शाहरूख खानचा जवान नावाचा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरू धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असल्याने सर्वत्र हाऊसफुल्ल चालत आहे. यादरम्यान आता या चित्रपटाबाबत एक नवी बातमी समोर आली आहे. पंरतू ती राजकीय आखाड्यातील असून, यामुळे आता देशातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे.(Will Shah Rukh’s ‘Jawaan’ be screened in Parliament? Congress leader’s question to the government)
Gadar-2 was shown in the new Parliament building a few days back. Will the Modi Sarkar have the courage to screen Jawan as well?
नए संसद भवन में कुछ दिन पहले गदर-2 दिखाया गया था। क्या मोदी सरकार में जवान की भी स्क्रीनिंग कराने की हिम्मत है?
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) September 9, 2023
काही दिवसांपूर्वी अभिनेता सनी देओलचा गदर-2 चे स्क्रीनिंग संसदेत करण्यात आल्याच्या चर्चेलानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी खुलासा केला होता. त्यानंतर आता हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा कलावंत शाहरूख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ जयराम रमेश यांनी ट्वीट करत शाहरूख खानच्या जवान चित्रपटाचे संसदेत स्कीनिंग करण्याची सरकाकडे हिम्मत आहे का? असा थेट सवाल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : भारतातील पहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला; उद्या होणार प्रकल्पाचा शुभारंभ
का दिले जयराम रमेश यांनी सरकारला आव्हान?
अभिनेता शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाच्या यशानंतर त्याचा आता जवान चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरूख खान याने सरकावर उघडपणे टीका केली आहे. त्यामध्ये शाहरुख खान याने या चित्रपटात काही राजकीय विधानं केल्याची चर्चा आहे. त्याने भारतातील शेतकरी, त्यांच्या आत्महत्या, त्यांना मिळणारे कर्ज आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबत त्यांनी उचलेले टोकाचे पाऊल यावर भाष्य केले आहे. एकुणच या चित्रपटाचे कथानक सरकारवर ताशेरे ओढणारे असेच आहे. त्यामुळे जयराम रमेश यांनी सरकालला या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्याचे आव्हान दिले आहे.
हेही वाचा : पाणी बंद, उपचार बंद, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक; राज्य सरकारला पुन्हा इशारा
निवडणुकांच्या तोंडावर राजकारण पेटण्याची शक्यता
शाहरूख खान याच्याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुका आधी आमिर खान याने दिग्दर्शित केलेला पीपली लाईव्ह चित्रपट सगळ्यांनी पाहला असेल. या चित्रपटातील कथानकही तत्कालीन सरकारवर भाष्य करणारे असेच होते. त्या चित्रपटाचेही स्क्रीनिंग संसदेत झाले होते. तर या चित्रपटाचा त्यावेळी झालेल्या निवडणुकांवर काय परिणाम झाला होते हे सांगणे कठीण आहे मात्र, सत्तांतर नक्कीच झाले आहे. दरम्यान आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधीच शाहरुख खानच्या जवानमधूनही सरकारच्या नितीवर भाष्य केले आहे. याचा कितपत परिणाम कसे होतात हे पहावे लागणार आहे.