घरदेश-विदेश२०१७ ची गुजरातची पुनरावृत्ती २०२२ ला महाराष्ट्रात होणार?

२०१७ ची गुजरातची पुनरावृत्ती २०२२ ला महाराष्ट्रात होणार?

Subscribe

गुजरातमध्ये २०१७ साली राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान झाले. दोन जागांवर अमित शाह आणि स्मृती इराणी विजयी झाले. मात्र, तिसऱ्या जागेसाठी भाजपचे बलवंतसिंह राजपूत आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांच्यात चुरस होती.

महाविकास आघाडी (mahavikas aghadi) आणि भाजपने (bjp) प्रतिष्ठेची केलेली राज्यसभेची सहा जागांसाठीची (Rajya Sabha Election 2022 News) निवडणुक आज पार पडली. यामुळे निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले असतानाच भाजपने मविआच्या तीन आमदारांचे मतदानच रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यामुळे मविआच्या नेत्यांची धाकधूक वाढली असून भाजप नेतेही अस्वस्थ झाले आहेत. पण राज्यसभेतला हा रडीचा डाव नवीन नसून याआधी २०१७ साली देखील अशाचप्रकारे गुजरातमध्येही असा प्रकार घडला होता. पण आज महाराष्ट्रातील (maharshatra)  राज्यसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे.

गुजरातमध्ये (gujrat) २०१७ साली राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान झाले. दोन जागांवर अमित शाह आणि स्मृती इराणी विजयी झाले. मात्र, तिसऱ्या जागेसाठी भाजपचे बलवंतसिंह राजपूत आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांच्यात चुरस होती. यावेळी जिंकण्यासाठी ४५ मत हवी असताना काँग्रेसच्या २ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं.  काँग्रेसच्या दोन्ही बंडखोर आमदारांनी मतदानादरम्यान भाजपच्या पोलिंग एजंटना आपलं बॅलेट दाखवलं होतं. त्यामुळे काँग्रेसने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्रीही यांनीही निवडणूक आयोगाकडे जाऊन काँग्रेसच्या मागणीला विरोध केला. मतमोजणी  6 तास थांबवून रात्री दोन वाजता निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या २ आमदारांची मते अवैध ठरवली. तर मतांचा कोटा ४४ करण्यात आला. त्यामुळे अहमद पटेल यांचा विजय झाला. पटेल यांनी ही निवडणूक अवघ्या अर्ध्या मताने जिंकली.

- Advertisement -

राज्यात आता गुजरातसारखीच परिस्थिती उद्धवत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे मतपत्रिका दिली तर यशोमती ठाकूर यांनीही नाना पटोलेंकडे मतपत्रिका दिली. नंतर सुहास कांदे यांनीही शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली असा आरोप करत या तिघांचे मत बाद करण्याची मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. यामुळे सध्या निवडणूक आयोगाने याची शहानिशा करण्यासाठी मतमोजणीच रोखली आहे. दरम्यान, मतमोजणीचे व्हिडीओच निवडणूक आयोगाने मागवले आहेत. यामुळे मतमोजणी केव्हा होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -