घरताज्या घडामोडीGallantry Awards 2021: विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला वीर चक्र !

Gallantry Awards 2021: विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला वीर चक्र !

Subscribe

भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे F-16 विमान शूट डाऊन करण्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्यांना वीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आले आहे. देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वीर चक्र पुरस्कार देऊन अभिनंदन वर्धमान यांना गौरविण्यात आले. २७ फेब्रुवारी २०१९ च्या घटनेत पाकिस्तान विमान शूट डाऊन केल्यानंतर स्वतः अभिनंदन हेदेखील जखमी झाले होते. तसेच पाकिस्तानच्या स्थानिकांकडून त्यांच्यावर हल्लाही झाला होता. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील चर्चेनंतर पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान सरकारने पुन्हा भारताकडे सोपविले. काही दिवसांपूर्वीच अभिनंदन यांची पदोन्नती विंग कमांडर पदावरून ग्रुप कॅप्टन अशी झाली आहे.

- Advertisement -

विंग कमांडर वर्धमान अभिनंदन हे फ्लाइंग पायलट MiG 21 बिसॉन स्क्वॉरडॉन याठिकाणी १९ मे २०१८ पासून नेमण्यात आले आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तान एअर फोर्सच्या ताफ्यातील F-16 आणि F-17 ही विमाने भारतीय सीमेच्या नजीक कूच करताना दिसून आली. त्यानंतर अतिशय धाडसी अशा कामगिरीने विरोधकांची रणनिती हाणून पाडण्यासाठी विंग कमांडर अभिनंदन यांनी पुढाकार घेतला. शत्रूमार्फतच्या या धोक्याची माहिती त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही दिली. पाकिस्तान एअरफोर्सच्या विमानांच्या शस्त्रातून भारतीय सेनेवर हल्ला होणार इतक्यातच विंग कमांडरने दाखवलेल्या चपळाईमुळे शत्रूची विमाने हाणून पाडण्यात यश आले. हवेतील युद्धामध्ये दाखवलेल्या चमकदार कामगिरीमुळेच पाकिस्तानचे हे विमान हाणून पाडण्यात अभिनंदन यांना यश आले. या घटनेत अभिनंदन यांना आपले विमान सोडण्याची वेळ आली. त्यानंतर विमान शत्रूच्या सीमेत सोडले असले तरीही त्यांच्या धाडसी कामगिरीमुळे देशावरचे संकट टळले. त्यांच्या अतिशय धाडसी कामगिरीनंतर १ मार्चला त्यांना भारतात पुन्हा पाठविण्यात आले. अभिनंदन यांच्या कामगिरीमुळे त्यांनी भारतीय वायू सेनेपुढे एक नवा आदर्श ठेवला.

सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ति चक्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या सुरक्षेसाठी असामान्य असे साहस दाखवणाऱ्या जवानांनचा राष्ट्रपती भवानामध्ये आयोजित कार्यक्रमात वीरता पुरस्काराने सन्मानित केले. जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांचा खात्मा केल्यासाठी सॅपर प्रकाश जाधव यांना मरणोत्तम कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांच्या पत्नी आणि आईकडे हा पुरस्कार सोपावला.

- Advertisement -

नायब सूबेदार सोमवीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र

नायब सूबेदार सोमबीर यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही हजेरी होती.

मेजर विभूति ढौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र

आपल्या साहसी कामगिरीने पाच दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या शहीर मेजर विभूति शंकर ढौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी लेफ्टनंट नितिका आणि आई यांच्याकडे राष्ट्रपती कोविंद यांनी हा पुरस्कार सुपूर्द केला.

मेजर विभूती ढौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्र

पाच दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या शहीद मेजर विभूति शंकर ढौंडियाल यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी लेफ्टनंट नितिका कौल आणि आईकडे राष्ट्रपती कोविंद यांना पुरस्कार सुपूर्द केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -