घरदेश-विदेशWinter Session of Parliament : 'तिसरी बार मोदी सरकार'; मोदींची Entry होताच...

Winter Session of Parliament : ‘तिसरी बार मोदी सरकार’; मोदींची Entry होताच खासदारांकडून घोषणा

Subscribe

आगामी लोकसभेची सेमीफायनल म्हणून संबोधल्या गेलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. दरम्यान 3 डिसेंबर रोजी पाच पैकी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने चारपैकी तीन राज्यावर सत्ता काबीज केली आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आज सोमवार (4 डिसेंबर) पासून सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेच्या लोकसभेत एंट्री होताच एनडीएच्या खासदारांनी तिसरी बार मोदी सरकार अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या गोंधळामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तबकूब करण्यात आले. (Winter Session of Parliament Third time Modi government Announcement by MPs after entry of Modi)

आगामी लोकसभेची सेमीफायनल म्हणून संबोधल्या गेलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. दरम्यान 3 डिसेंबर रोजी पाच पैकी चार राज्यांचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने चारपैकी तीन राज्यावर सत्ता काबीज केली आहे. तर कॉंग्रेसला फक्त तेलंगणा या एकाच राज्यात सत्ता मिळवण्यात यश आले. या निवडणुकांचे निकाल लागताच आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच पंतप्रधान मोदींनी मीडियाशी संवाद साधत विरोधकांवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. बाहेर झालेल्या पराभवाचा राग संसदेत काढू नका असा खोचक सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. त्यानंतर ते संसदेच्या लोकसभा सभागृहात पोहचताच त्यांना पाहून एनडीएच्या खासदारांनी तिसरी बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लोकसभा सभागृहात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीदेखील उपस्थिती होती. दोघे हसत-हसत संवाद साधताना दिसून आले. मात्र, खासदारांच्या या घोषणाबाजीमुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : INDIAN NAVY DAY : शं नो वरुणः भारतीय नौदलाची गौरवगाथा, ‘असा’ आहे इंडियन नेव्हीचा इतिहास

विरोधी पक्षातील नेत्यांचे खलबते

तीन डिसेंबर रोजी भाजपने विरोधकांचा सुपडासाफ केला. त्यानंतर आज संसदेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाआधी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पक्ष कार्यालयात विरोधी पक्षातील नेत्याची बैठक पार पडली. या बैठकीच्या विषयाचे कारण पुढे आले नसले तरी मात्र, ही बैठक निवडणुकीतील पराभवामागील कारणं शोधणारी नक्कीच होती.

- Advertisement -

हेही वाचा : Mizoram Assembly Election Result 2023 : इंदिरा गांधीचे सुरक्षा प्रमुख CM पदाच्या शर्यतीत सर्वात…

असा मिळवला भाजपने विजय

तीन डिसेंबर रोजी लागलेल्या निवडणूक निकालात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मध्य प्रदेशात भाजपने प्रचंड बहुमत मिळवत 163 जागा जिंकल्या आहेत. तर राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या. छत्तीसगडमध्ये 54 जागा जिंकून सत्ता काबीज करण्यात भाजपला यश आले आहे. त्याचवेळी तेलंगणात काँग्रेसने 64 जागा जिंकल्या. मिझोराम निवडणूक 2023 च्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -