घरदेश-विदेशसंसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु; 23 दिवसांत होणार 17 बैठका

संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु; 23 दिवसांत होणार 17 बैठका

Subscribe

संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरु होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, संसदेच्या हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यादरम्यान 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत. या अमृत काल अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या कामकाजावर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होईल अशी आशा व्यक्त करतो . (Winter session of Parliament will start from december 7 till december 29 Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi informs)

नुकतेच निधन झालेल्या खासदारांच्या स्मरणार्थ हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस तहकूब करण्यात येणार आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा समावेश आहे. या अधिवेशनात कोणताही कोविड प्रोटोकॉल लागू नसेल अशी सूत्रांची माहिती आहे.

- Advertisement -

हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता

संसदेचे पहिलेच अधिवेशन असेल ज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.  केंद्र सरकारकडून त्या विधेयकांची यादी तयार केली जात असून, ती चालू अधिवेशनात मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे संसद भवन सचिवालयाने संसद भवनातील सोफ्यांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात खासदार आणि मान्यवरांच्या सोयीसाठी ठेवलेल्या सोफ्यांवर बसून वेळ घालवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे. दिलेल्या सूचनांचे काही अधिकारी आणि कर्मचारी पालन करत नसल्याचे आढळून आल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.


एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली; सावरकरांचे नातू रणजीत यांचा गंभीर आरोप

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -