घरदेश-विदेशधक्कादायक! सरकारी रुग्णालयात डॉक्टरांऐवजी मांत्रिकाकडून उपचार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात डॉक्टरांऐवजी मांत्रिकाकडून उपचार

Subscribe

मध्य प्रदेशच्या एका सरकारी रुग्णालयात डॉक्टरांऐवजी मांत्रिकाकडून उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मध्य प्रदेशच्या शिवपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवपूरच्या सरकारी रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका पीडित रुग्णावर उपचार करण्याऐवजी एक मांत्रिक कडुलिंबाची फांदी पीडिताच्या अंगावर फिरवत होता. हा प्रकार साधारणत: १५ ते २० मिनिटे चालला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र, त्यापैकी कुणीही या प्रकारावर आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सुरु होता. पीडित रुग्ण उपचारासाठी याचना करत होता. मात्र, कुणीही त्याकडे लक्ष्य न देता मांत्रिकाच्या करामतींकडे लक्ष देत होते.

हेही वाचा – ‘या’ साठी बायको लाडूशिवाय दुसरे काही खाऊच देत नाही

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

गुरुवारी शेतात काम करत असताना योगेंद्र सिंह रोठोड या शेतकऱ्याला एका विषारी सापाने दंश केला. त्यानंतर तातडीने त्याला शिवपूरच्या सरकारी रुग्णालयात गावकरी घेऊन गेले. मात्र, तिथे राठोड यांच्यावर उपचार करण्याऐवजी एका मांत्रिकाकडून विष उतारले जात होते. हा सर्व प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. त्यामुळे या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनावर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या मुख्य अधिकाऱ्याकडून रुग्णालय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.


हेही वाचा – भूताने झपाटले म्हणत मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार

- Advertisement -

मांत्रिकाच्या उपचाराचा व्हिडिओ व्हायरल

मांत्रिकाकडून विष उतरवण्यासाठी सुरु असलेल्या उपचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळेच हा सर्व प्रकार उघड झाला आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पीडित रुग्णावर मांत्रिकाकडून कडुलिंबाची फांदी जेव्हा त्याच्या शरीरावर फिरवली जात होती त्यावेळी तिथे एक स्थानिक पत्रकार पोहोचला. त्याने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवला आणि हा प्रकार जगासमोर उघड झाला. त्या व्हिडिओमध्ये रुग्ण उपचारासाठी याचिका करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -