Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश गरोदरपणाची लक्षणं नसताना २० वर्षीय तरूणीने दिला बाळाला जन्म!

गरोदरपणाची लक्षणं नसताना २० वर्षीय तरूणीने दिला बाळाला जन्म!

Related Story

- Advertisement -

तुम्ही Premature Pregnancy म्हणजेच ९ महिन्यांच्या आधी होणाऱ्या गर्भधारणेशी संबंधित अनेक किस्से ऐकली असतील. मात्र इंग्लंडच्या नॉरफोकमध्ये दोन महिन्यांच्या गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिल्याचे समोर आले आहे. वेळेआधी बाळ जन्माला आल्यानंतर सध्या आई आणि मूल दोघेही ठीक असून या प्रकारानंतर डॉक्टर या गर्भधारणेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. मिरर यूकेने दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय एरिन हॉग हिला १० ऑगस्ट रोजी अचानक पोटात दुखण्यास सुरूवात झाली. यानंतर तिने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात गेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. ज्यावेळी डॉक्टरांनी तिला तपासले त्यावेळी ती मुलगी ६ ते ८ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगितले.

… आणि प्रसूती वेदना झाल्या सुरू

रुग्णालयातून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एरिनला पुन्हा तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. वेदना इतक्या वाढल्या की ती रुग्णालयातही जाऊ शकली नाही. त्यामुळे एरिनाच्या कुटुंबाला घरी रुग्णवाहिका बोलवावी लागली. रुग्णवाहिका बोलावल्यानंतर काही वेळातच वैद्यकीय कर्मचारी एरिनच्या घरी दाखल झाले आणि घरीच तिची प्रसूती करावी लागली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसूती यशस्वी झाली असली तरी एरिन आणि तिच्या पतीसह डॉक्टर देखील चकीत झाले आहेत. कारण एरिनने ६ ते ८ आठवड्यांत बाळाला जन्म कसा दिला. एरिनच्या बाळाचे वजन सुमारे ६ पौंड होते. ती पूर्णपणे निरोगी होती. प्रसूतीनंतर, एरिनला रुग्णालयात नेण्यात आले कारण तिचे खूप रक्त गेले होते. विशेष म्हणजे एरिनने १५ महिन्यांपूर्वी याच रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता. एरिनने असे सांगितले की, ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे याची तिला कल्पना नव्हती. तिची मासिक पाळी नियमितपणे होत होती, गर्भधारणेची कोणतीही लक्षणे नव्हती आणि बेबी बंप देखील नव्हते. या सर्व प्रकारामुळे ती देखील स्वतः हैरान झाली आहे.


Corona Vaccine: गुडन्यूज! या आठवड्यात स्वदेशी लसीला WHO कडून मिळणार मंजूरी

- Advertisement -