घरताज्या घडामोडीडेंग्यू रोखण्यासाठी वोल्बाशिया बॅक्टेरियाचा पहिलाच प्रयोग

डेंग्यू रोखण्यासाठी वोल्बाशिया बॅक्टेरियाचा पहिलाच प्रयोग

Subscribe

जगभरात डेंग्यूच्या आजाराने दरवर्षी लाखो लोकांना आजाराचा सामना करावा लागतो. जागतिक आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी डेंग्यूचे ५ कोटी रूग्ण आढळतात. डेंग्यूचा आजार फैलावणाऱ्या मच्छरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बॅक्टेरियाचा यशस्वी वापर करण्याचे तंत्रज्ञान हे नुकत्याच एका अभ्यासातून समोर आले आहे. या संशोधनामुळे आता डेंग्यूविरोधी लढाईला बळ आल्याचे बोलले जात आहे. न्यू इंग्लंडच्या जरनल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार वोल्बाशिया या बॅक्टेरियामुळे डेग्यूंच्या संसर्गामध्ये घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. जवळपास ७७ टक्के लोकांना डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

वोल्बाशिया बॅक्टेरियामुळे रूग्णालयात भरती होणाऱ्यांची टक्केवारीही कमी झाल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. जावा आयलॅंड येथील योग्याकार्टा येथे झालेल्या संशोधनादरम्यान ही माहिती समोर आली आहे. वर्ल्ड मॉक्सिटो प्रोग्राम अंतर्गत ऑस्ट्रेलियाच्या मोनॅश युनिवर्सिटी आणि इंडोनेशियाच्या गदजह मॅडा युनिवर्सिटीच्या माध्यमातून हे संशोधन हाती घेण्यात आले होते. डेंग्यूचा संसर्ग ७७ टक्क्यांनी कमी होण्यासाठी बॅक्टेरिया उपयुक्त ठरणे ही बाब संशोधनातून समोर आली. या संशोधनातील निकालामुळे अतिशय उपयुक्त अशी आकडेवारी आणि माहिती समोर आली आहे, असे अदी उतरीनी या गदजह मॅडा युनिवर्सिटीच्या एका सार्वजनिक आरोग्य विषयातील संशोधकांने दिली.

- Advertisement -

या संशोधनाअंतर्गत वोल्बॅशिया या बॅक्टेरियाचा वापर योग्याकार्टा येथील काही ठराविक भागात करण्यात आला होता. संशोधनाचा भाग म्हणून ४५ वयोगटातील व्यक्तींना डेंग्यूची लागण किती प्रमाणात होते ही बाब तपासण्यात आली. त्यानंतर हा बॅक्टेरिया शहरातील आणखी भागातही वापरण्यात आला.

मलेरिया संसर्गावर नियंत्रण शक्य 

वोल्बाशिया या बॅक्टेरियाच्या वापरामुळे डेंग्यूचा संसर्ग करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे एडिस जातीचे डास जेव्हा माणसांना दंश करतात तेव्हा त्यांच्याकडून संसर्ग पसरवण्याचा धोका कमी होतो असे संशोधनातून समोर आले आहे. याआधी झालेल्या बोल्बाशियाच्या चाचण्यांमध्ये फळांवरील माशा आणि इतर कीटकांसाठीही या बॅक्टेरियाचा वापर करण्यात आला होता. या संशोधनात सकारात्मक असा परिणाम समोर आला होता. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही पद्धती जगभराती डेग्यूंच्या लढ्याविरोधात गेमचेंजर अशी ठरू शकते. वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रामचे संचालक स्कॉट ओनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार तेदेखील या संपुर्ण निकालाची प्रतिक्षा करत आहेत. वोल्बाशिया ही पद्धती अतिशय सुरक्षित असून, शाश्वत आणि डेंग्यूचे रूग्ण कमी करण्यासाठी परिणामकारक अशी आहे. जेव्हा या तंत्रज्ञानाचा उपयोग हा जागतिक पातळीवर होईल तेव्हा नक्कीच डेंग्यूचे रूग्ण असलेल्या ठिकाणी रूग्णसंख्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होईल असेही ते म्हणाले. आतापर्यंत वोल्बाशियाच्या वापरानुसार झिका, चिकनगुनिया, यलो फिव्हर आणि डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी या वोल्बाशिया पद्धतीचा चांगला परिणाम समोर आला आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -