घरदेश-विदेशमार्कांच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

मार्कांच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

Subscribe

चांगल्या मार्कांच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने गुन्हा दाखल केला आहे.

चांगले मार्क देण्यासाठी ब्लॅकमेल करून नर्सिंग कॉलेजमधल्या तरुणीचा विनयभंग करणाऱ्या एका प्राध्यापकाला पोलिसांनी अटक केल्याची घटना आन्ध्र प्रदेशमध्ये घडली आहे. विजयवाडामधल्या मछलीपटनम पोलिसांनी ही कारवाई केली असून एस. रमेश असं या ४८ वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी सारा ग्रेस स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये शिकवत असून तिथल्याच एका विद्यार्थिनीकडे लैंगिक सुखाची मागणी करणे आणि त्यासाठी चांगले मार्क देण्याचं आमिष दाखवण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जातीवाचक टिप्पणी केल्याचा देखील आरोप या तरुणीने केला आहे.

हॉस्पिटलमध्ये नोकरीचं देखील आमिष

आपल्या तक्रारीमध्ये या तरुणीने रमेशच्या वागणुकीविषयी सविस्तर नमूद केलं आहे. रमेश या विद्यार्थिनींचे चुकीच्या पद्धतीने क्लास घेत असे. शिवाय कॉलेजच्या कॅम्पसमध्येच तो मित्रांसाठी पार्टी देखील द्यायचा. रमेशने पीडित विद्यार्थिनीकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. तसेच, त्याबदल्यात परीक्षेत चांगले मार्क आणि एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी देखील देण्याचं कबूल केल्याचं या तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा तरुणीने हा सगळा प्रकार तिच्या पालकांना सांगितला, तेव्हा रमेशने तिला धमकी देखील दिल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महिलेचा ऑनलाईन विनयभंग, विकृताला अटक

केरळमध्ये देखील गुन्हे दाखल

याआधी देखील रमेशने केरळमध्ये विद्यार्थिनींना अशाच प्रकारे त्रास दिला असून त्याच्या विरोधात गुन्हे देखील दाखल आहेत, असं या तरुणीने सांगितलं. २००६मध्ये रमेशने एमबीबीएसच्या जागांसाठी अनेक विद्यार्थ्यांना फसवलं असून त्यांच्याकडून लाखो रुपये लाटले आहेत. त्यात त्याला तुरुंगवास देखील झाला होता. पण बाहेर आल्यावर त्याने नर्सिंगचं प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -