धक्कादायक! गाडलेल्या महिलेचा मृतदेह आला कब्रस्तानातून बाहेर आणि…

शेतात महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत दिसल्यावर गावकऱ्यांच्या मनात भिती

प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात बांगरमऊ-बिल्लौर रोडवर गंगा नदी पुलाच्या नानामऊ घाटाजवळ शेतात महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. यानंतर एकच खळबळ माजली. शेतात महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत दिसल्यावर गावकऱ्यांच्या मनात भिती निर्माण झाली. यावेळी ग्रामस्थांनी या घटनेची माहिती सांगण्यास पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आसपासच्या गावातील लोकांच्या मदतीने मृतदेह ओळखण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल होताच महिलेचा नवराही घटनास्थळी पोहोचला आणि त्याने मृतदेहाची ओळख पटविली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. गेल्या शुक्रवारी बाळाच्या जन्मदरम्यान तिचा मृत्यू झाला, असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर शनिवारी मृतदेह गंगेच्या काठी पुरण्यात आला असल्याचीही त्याने माहिती दिली.

उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ कोतवाली अंतर्गत गंगा नदी पुलाखालील अंटवा गावाजवळ काही शेतकरी शेतात मोहरी काढत होते. यावेळीच एका शेतकर्‍याला या महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत दिसला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्यांने आरडा-ओरडा सुरू केला त्यानंतर तिथे गर्दी जमताच ग्रामस्थांनी बांगरमऊ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जवळच्या गावातील लोकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. दरम्यान, परिसरातील आलमपूर गावात राहणारा एक तरुण आला आणि त्याने मृतदेहाची पत्नी म्हणून ओळख पटविली.

तपासणीनंतर बंगारमाऊ भागात राहणाऱ्या सुरेंद्र कुमारच्या पत्नीचा मृतदेह असल्याचे समजले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की पत्नीची प्रसूती होणार होती म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रसूती दरम्यान त्याच्या मुलाचा मृत्यू झाला. यावेळीच त्याच्या पत्नीची प्रकृती देखील खराब झाली. त्यामुळे आयसीयूमध्ये पुढील उपचारांसाठी नेतांनाच तिचा या प्रवासादरम्यान मृत्यू झाला. आई व मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी दोघांना एकाच खड्ड्यात पुरले. पण त्या खड्ड्यातून मृतदेह कसा बाहेर आला, याचा पोलिस तपास करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला असून त्यानंतरची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.