घरताज्या घडामोडीसेल्फीने घेतला जीव, १०० फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

सेल्फीने घेतला जीव, १०० फूट खोल दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

Subscribe

सेल्फी काढणे किती घातक आहे, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. तरी देखील लोकांचा सेल्फी काढण्याचा मोह मात्र कमी झाला नाही. सेल्फी वेड्या एका महिलेचा डोंगराच्या कड्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना बेल्जियममध्ये घडली आहे. ही महिला १०० फूट खोल पडली. महिला आपल्या पतीला डोंगराच्या कड्यावरून फोटोशूट करायला लावत होती अन् त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

३३ वर्षीय स्नोक्स नावाची महिला पती जोएरी जानसेनसोबत बेल्जियममध्ये फिरण्यासाठी गेली होती. शाळेपासून दोघं एकमेकांवर प्रेम करायचे आणि २०१२मध्ये दोघांनी लग्न केले होते. मंगळवारी सकाळी लक्जमबर्ग प्रांतच्या नाद्रिन गावाजवळ फोटोशूट करत होतो. डेलीमेलच्या वृत्तानुसार, महिला १०० फूट उंच ठिकाणी उभी राहून पतीला फोटो काढण्यासाठी सांगत होती. अचानक तिचा पाय घसरला. महिला थेट नदीत पडली आणि तिचा मृत्यू झाला. लक्जमबर्ग प्रांतमध्ये पब्लिक प्रोसेक्यूटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ती डोंगराच्या कड्यावरून घसरली आणि ओर्थे नदीत पडली. यानंतर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि स्कूबा डायव्हर्स एका मेडिकल हेलिकॉप्टरने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा नदीतील मृतदेह बाहेर काढला.

- Advertisement -

महिलेचा पती जोएरी म्हणाला की, आम्ही रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडलो होतो. कोरोना महामारीनंतर युरोपात प्रवास करून काही सुंदर फोटो काढण्याचा आमचा विचार होता. ज्या दिवशी स्नोक्सचा मृत्यू झाला त्यादिवशी ते दोघे घरी परतणार होते. ४५०० फूट उंच डोंगर पाहण्यासाठी त्या दिवस पहाटे लवकर उठलो होतो. सेल्फी काढताना पत्नीने मला कुत्र्यांना पाहायला सांगितले. मी कुत्र्यांना पाहण्यासाठी मागे वळलो तितक्यात ती नाहीशी झाली. पाच सेकंदापेक्षा कमी वेळात ती खाली पडली. मला काहीच ऐकू आले नाही, ना कोणता ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर पत्नीला जोरजोरात आवाज दिला. पण काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे त्वरित आपात्कालीन सेवा देणाऱ्यांना फोन केला. परंतु तोपर्यंत खूपच उशिर झाला होता.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -