घरताज्या घडामोडीन्यूड फोटो पाठवणाऱ्याला महिलेनं असा काही रिप्लाय दिला, तो सुतासारखा सरळ झाला!

न्यूड फोटो पाठवणाऱ्याला महिलेनं असा काही रिप्लाय दिला, तो सुतासारखा सरळ झाला!

Subscribe

महिलांना कधींना कधी अश्लील चॅटला सामोर जावे लागते. अज्ञात व्यक्ती हे महिलेना अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी काही महिला पोलीसात धाव घेतात तर काही महिला त्या अज्ञात व्यक्तीला ब्लॉक करतात. पण ब्रिटनमधल्या महिलेने अशा अज्ञात व्यक्तीला असा काही रिप्लाय दिला की तो सुतासारखा सरळ झाला. या रिप्लाय दिलेल्या महिलेचा सध्या सोशल मीडियावर चांगलचं कौतुक होत आहे.

ही महिला ब्रिटनच्या नॉर्थ यॉर्कशायर मधली असून तिचे नाव अलेक्जेंड्रा कुरी असे आहे. तिने न्यूड फोटो शेअर केलेल्या अज्ञात व्यक्तीला असा रिप्लाय दिला की तो घाबरला. या अज्ञात व्यक्तीने महिलेला हाफ नेकेड फोटो पाठवले होते. ज्यावर तिने अनोखा रिप्लाय दिला आहे. तिने रिप्लाय देताना रोबोटच्या रुपात स्वतःला सादर केले आणि लिहिले की, ‘AUTOREPLY: आम्हाला अश्लील फोटो प्रसारित झाल्याचे आढळले आहे. जे कदाचित बेकायदेशी स्वरुपाचे आहे. [code:36489-a] आणि तुमचा डिव्हाईजचा आयपी अड्रेस पोलीस डिपार्टपेंटला तपासणीसाठी पाठविला जात आहे.’

- Advertisement -

त्या महिलेने पुढे लिहिले की, ‘जर तुमच्याकडून हे चुकून झाले असेल तर तुम्ही STOP हा रिप्लाय करा.’

महिलेचा हा रिप्लाय पाहून अज्ञात व्यक्ती घाबरला. त्याने घाबरून लगेच STOP मेसेज पाठवला. तो इतका घाबरला की त्याने दोन वेळा STOP हा मेसेज पाठवला.

- Advertisement -

अलेक्झांड्राचा हा रिप्लाय लोकांचा फारच आवडला आहे. तसेच लोकं भविष्यात अशा प्रकारे अशा घटनांचा सामना करा असे सांगितले आहे. ट्विटरला सात लाखांहून अधिक लोकांना तिचा हा रिप्लाय आवडला आहे. बऱ्याच महिलांना लिहिले आहे की, ‘त्यांनीही हा रिप्लाय कॉपी करू ठेवला आहे. जर कोणी अश्लील मेसेज पाठवला तर धडा शिकवण्यासाठी तेच हीच पद्धत अवलंबणार आहेत.’


हेही वाचा – ‘तुझ्यासाठी बायकोला घटस्फोट दिला आणि तू मला’, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला भररस्त्यात चोपलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -