एअर इंडिया पुन्हा वादात; महिला प्रवाशाला विमानातील खाद्यपदार्थात सापडले बारीक दगड

मागील अनेक दिवसांपासून विमानात घडणाऱ्या घटनांमुळे एअर इंडिया कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानातील शौचालयात धुम्रपान करणे, वृद्ध महिलेवर लघुशंका करणे या घटना ताज्या असतानाच आता एका महिलेला जेवणात बारीक दगड सापडल्याची माहिती समोर आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून विमानात घडणाऱ्या घटनांमुळे एअर इंडिया कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानातील शौचालयात धुम्रपान करणे, वृद्ध महिलेवर लघुशंका करणे या घटना ताज्या असतानाच आता एका महिलेला जेवणात बारीक दगड सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (woman finds stone in food served on air india flight said such carelessness is unacceptable)

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये एअर इंडियाने विमानात दिलेल्या जेवणात दगडाचा तुकडा सापडल्याचे दिसत आहे. सर्वप्रिया सांगवान असे या ट्विटर युझरचे नाव आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट AI 215 मध्ये या महिलेला जेवणात दगड सापडले. याप्रकरणी सर्वप्रिया सांगवान या महिलेने क्रू मेंबरकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, हा निष्काळजीपणा असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वप्रिया सांगवान यांच्या ट्वीटनंतर एअर इंडियाने त्यांच्या ट्वीटची दखल घेतली आहे. यामध्ये एअर इंडियाने लिहिले की, ”प्रिय मॅडम, हे चिंताजनक आहे आणि आम्ही आमच्या केटरिंग टीमसमोर ठेवत आहोत. कृपया आम्हाला या प्रकरणाकडे लक्ष देण्यासाठी थोडा वेळ द्या. हे आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही तुमचे कौतुक करतो”, असे लिहिले.

या प्रकरणानंतर एका युझरने लिहिले, “डिअर @TataCompanies : JRD Tata ने एकदा विमान उद्योगासाठी बेंचमार्क सेट केले. सरकारी नियंत्रणाखाली येण्यापूर्वी त्यांनी एअर इंडिया हा जागतिक स्तरावर प्रतिष्ठित ब्रँड बनवला. आता तुम्ही मालक म्हणून परत आला आहात. कॉर्पोरेट निरीक्षण नाही का?

दरम्यान, सोमवारी DGCA ने प्रवाशांसोबत असभ्य वर्तनाच्या दोन प्रकरणांबाबत एअर इंडियाला नोटीस पाठवली आहे. तुमच्याकडून वेळीच कारवाई का झाली नाही, असे डीजीसीएकडून एअर इंडियाला सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Hockey World Cup 2023 : भारताचे सामने कधी आणि कुठे होणार; पाहा वेळापत्रक