नवी दिल्ली : सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आले आहे. पण यामुळे अनेक अजब गजब गोष्ट पाहायला मिळतात. अशामध्ये व्हर्च्युअल मैत्री हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपण ज्यांना कधीही भेटत नसलो तरी आपण सोशल मीडियाद्वारे त्यांना ओळखत असतो. अशामध्ये गेल्या काही काळात अनेक अशा गोष्टी ऐकिवात आहेत, ज्यामध्ये दोन जणांची ओळख होते आणि त्यांच्यात प्रेम प्रकरणाला सुरुवात होते. अशामध्ये नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये विदेशातील एका मुलीचे भारतातील एका भाजी विक्रेत्यावर प्रेम जडले आणि तिने लग्नासाठी थेट भारतच गाठले. (Woman from philippines came india to marry vegetable wholeseller unique marriage story)
हेही वाचा : Champions Trophy : आयसीसीला उत्तर द्यावे लागेल; उपांत्य फेरीआधी विवियन रिचर्ड्सकडून हा मुद्दा उपस्थित
सध्या सोशल मीडियावर एक गोष्ट चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गुजरातमधील एका भाजी विक्रेत्याची मैत्री फिलीपिन्समध्ये राहणाऱ्या एका मुलीशी झाली आणि तिने थेट भारत गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, ही गोष्ट आहे पिंटू नावाच्या गुजरातमधील एका घाऊक भाजीपाला व्यापाऱ्याची. त्याने फेसबुकवर फिलीपिन्समधील एका मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती मुलगी तिच्या वडिलांसोबत रेस्टॉरंट चालवते. पण, पिंटूला इंग्रजी येत नसल्याने सुरुवातीला त्यांचे संभाषण फक्त हाय आणि हॅलोपुरते मर्यादित ठेवले होते. त्यानंतर त्यांनी इमोजी आणि व्हिडिओंद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. अशामध्ये पिंटूने सांगितले आहे की, आम्ही नीट बोलू शकत नव्हतो. पण तिच्या हावभावावरून सर्व काही कळत होते. पिंटूच्या दयाळू, संवेदनशील तसेच प्रामाणिक वागण्याने ती प्रभावित झाल्याचे तिने सांगितले.
इंस्टाग्रामवरील storiyaan_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या गोष्टीनंतर प्रेमाला भाषेची गरज नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे या पेजवरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एके दिवशी पिंटूने तिला एक पार्सल पाठवले, ज्यामध्ये त्याने मुलीला भेटवस्तू देत मागणी घातली. तिने व्हिडिओ कॉलवर पार्सल उघडले आणि दोघांच्या डोळ्यात पाणी आले. तिने हो म्हटले, तरीही दोन वर्षे ते दोघे एकमेकांपासून लांब असूनही नात्यात राहिले. त्यांनतर नंतर पिंटू तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी फिलीपिन्सला गेला. त्याच्या कुटुंबालाही ती खूप आवडली आणि अखेर त्यांनी ख्रिश्चन तसेच हिंदू पद्धतीने लग्न केले.