घरदेश-विदेशअमानुषतेचा कळस! पतीसमोरच १७ जणांनी पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

अमानुषतेचा कळस! पतीसमोरच १७ जणांनी पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

Subscribe

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

माणुसकीला काळीमा फासणारी आणि अमानुषतेचा कळस ओलांडणारी धक्कादायक घटना झारखंडमधील डुमका येथे घडली. पतीसमोरच पत्नीवर १७ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ माजली. मंगळवारी रात्री जत्रेहून घरी परतत असणाऱ्या ३५ वर्षीय महिलेवर १७ जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांकडून १७ नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -

असा घडला प्रकार

पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पतीसोबत ही महिला बाजारातून परतत होती. यावेळी सर्व १७ आरोपी तिथे हजर होते. या सर्वांनी त्यांना रस्त्यातच आडवले. हे १७ नराधम दारूच्या नशेत असताना त्यांनी या महिलेचे अपहरण केले आणि ओढत जवळच्या झाडीत घेऊन गेले. यावेळी इतरांनी या महिलेच्या पतीला धरुन ठेवले होते. यानंतर आळीपाळीने पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला”.

दरम्यान, ही धक्कादायक घटना झारखंडमधील मुफस्सिल पोलीस ठाणा हद्दीत घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तातडीनं त्यांना बेड्या ठोकण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला अटक केली आहे. तर १६ फरार झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -