Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश पंजाबमध्ये महिलेची हत्या; गुरुद्वारा परिसरात दारू पीत असल्यामुळे भाविकाने झाडल्या गोळ्या

पंजाबमध्ये महिलेची हत्या; गुरुद्वारा परिसरात दारू पीत असल्यामुळे भाविकाने झाडल्या गोळ्या

Subscribe

नवी दिल्ली : पंजाबमधील पटियाला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गुरुद्वारा परिसरात दारू पीत असल्यामुळे भाविकाने आपल्या परवानाधारक बंदुकीतून महिलेवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. निर्मलजीत सिंग (Nirmaljit Singh) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Woman shot dead in Gurdwara area for drinking alcohol)

पटियाला येथील गुरुद्वाराबाहेर रविवारी रात्री 10 वाजता दु:ख निवारन साहिबच्या आवारातील तलावाजवळ परविंदर कौर (32) (Parvinder Kaur) ही महिला दारू पीत होती. यावेळी गुरुद्वारातील कर्मचाऱ्यांनी महिलेला दारू पिण्यापासून रोखले आणि त्या महिलेला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला यावेळी तिने कर्मचाऱ्यांवर दारूच्या बाटलीने हल्ला केला.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! वडिलांनी ५ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीतून घरी नेला; जाणून घ्या संपूर्ण घटना

कर्मचारी महिलेची चौकशी करत असताना जवळच उभ्या असलेल्या आरोपी निर्मलजीत सिंगने आपल्या परवानाधारक बंदुकीतून महिलेवर पाच गोळ्या झाडल्या. यावेळी महिलेला तीन गोळ्या लागल्या, तर कर्मचारी सागर कुमार यालाही गोळी लागली. यावेळी महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सागरला पोटात गोळी लागल्यामुळे त्याला जखमी अवस्थेत  राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाच – Adani-Hindenburg case : सेबीच्या प्रतिज्ञापत्रानुसार 2016 पासून अदानी ग्रुपच्या तपासाचे सर्व दावे तथ्यहीन

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने हल्लानंतर आत्मसमर्पण केले आहे. अनाज मंडी पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. तसेच घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी गुरुद्वारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

आरोपी मानसिक तणावाखाली होता
आरोपी निर्मलजीत सिंग सैनी यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर तो मानसिक तणावाखाली होता आणि नियमितपणे गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येत होता, अशी माहिती आरोपीच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.

 

- Advertisment -