नातेवाईक आले नाहीत, अखेर पत्नीनेच पीपीई कीट घालून नवऱ्याला दिला अग्नी!

Woman Lights Funeral Pyre Of Husband While Wearing PPE Kit In odisha
नातेवाईक आले नाहीत, अखेर पत्नीनेच पीपीईकीट घालून नवऱ्याला दिला अग्नी!

ओडिशामधील एका महिलेने अनेक वर्षांची परंपरा मोडत आपल्या पतीवर अंत्यसंस्कार केले. मजबुरीमुळे तिला हे पाऊल उचलावे लागले, कारण अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नातेवाईक आले नव्हते. महिलेने पीपीई किट घालून सर्व अंतिम विधी पूर्ण केले. तिने पतीला खांदा देऊन नंतर अग्नीही दिली.

ओडिशामधील मलकानगिरी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मैथिली ब्लॉकमध्ये मंडापल्ली गाव आहे. येथे कृष्णा नायक नावाचे व्यक्ती राहत होते. कृष्णा या ब्लॉकचा शिक्षणाधिकारी होता. दोन दिवसांपूर्वी त्याची अचानक तब्येत खराब झाली. त्यामुळे त्याला जेपोर रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर रुग्णालयाने त्याला कोरापुटमध्ये असलेल्या शाहीर लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज रेफर केला. त्याच वेळे त्याची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्याची कोविड चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तब्येत जास्तच गंभीर होत असल्यामुळे डॉक्टरांनी नायक यांना विशाखापट्टनम येथे हलवण्यास सांगितले. पण विशाखापट्टनमला जाताना रस्त्याच त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला. परंतु अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नातेवाईक आले नाही. तसेच शेजाऱ्याने देखील पाठ फिरवली. सगळ्या कोरोनाची भिती होती. कृष्णाच्या पत्नीने अनेक लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच आले नाही. शेवटी तिने पतीला स्वतःला अग्नी देण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतः पीपीई किट घालून पतीचे सर्व अंत्यसंस्काराचे विधी केले. तिने स्वतः रुग्णवाहिकेला बोलवून मेडिकल स्टाफच्या मदतीने जंगलात मृतदेह घेऊन गेली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून उतरून तिने पतीला खांदा दिला. मग सर्व विधी करून तिने अग्नी दिली. यादरम्यान तिच्यासोबत मेडिकल स्टाफ देखील होता.


हेही वाचा – Corona: ‘हा’ चहावाला करतोय कोरोनामृतांवर अंत्यसंस्कार