घरक्राइमपत्नीला एका वर्षाहून अधिक काळ शौचालयात डांबून ठेवलं; धक्कादायक कारण समोर आलं

पत्नीला एका वर्षाहून अधिक काळ शौचालयात डांबून ठेवलं; धक्कादायक कारण समोर आलं

Subscribe

हरियाणा राज्यातील पानिपत येथे एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. एक महिला वर्षाहून अधिक काळ एका छोट्या शौचालयात बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. ३५ वर्षीय या महिलेला तिच्या नवऱ्यानेच शौचालयात बंद करुन ठेवले होते. हरियाणाच्या महिला व बालविकास विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर या विभागाच्या जिल्हाप्रमुख रजनी गुप्ता यांनी या महिलेची सुटका केली आहे. तसेच हे अमानुष कृत्य करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

एका वृत्तसंस्थेला माहिती देताना रजनी गुप्ता म्हणाल्या की, “आम्हाला या महिलेबाबत माहिती मिळाली होती. एक वर्षाहून अधिक काळ ही महिला अमानुष पद्धतीने शौचालयात बंद असल्याचे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आम्ही एक पथक घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही सदर महिलेची सुटका केली. त्यानंतर महिलेला व्यवस्थित आंघोळ करुन तिला बोलते केले.”

- Advertisement -

बरेच दिवस काहीच न खाल्ल्यामुळे या महिलेची अवस्था अतिशय हलाखीची झालेली दिसून येत आहे. गुप्ता पुढे म्हणाल्या की, “या महिलेला बाहेर काढल्यानंतर तिला जेवायला दिल्यानंतर तिने ८ चपात्या खाल्ल्या. ती शौचालयात बंद असताना तिला वेळेवर पुरेसे जेवण आणि पाणी दिले जात नव्हते.” पतीच्या म्हणण्यानुसार ही महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. मात्र आम्ही जेव्हा तिच्याशी बातचीत केली, तेव्हा आम्हाला तसे काही वाटले नाही. पण याची खातरजमा डॉक्टरच करु शकतात. आता पोलिसांनी पतीच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

woman locked in Toilet

- Advertisement -

तर पतीने आपल्या बचावात सांगितले की, “माझ्या पत्नीची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. आम्ही तिला अनेक डॉक्टरांना दाखवले, पण काही फरक पडला नाही. तिलाच शौचालयात जाऊन बसायचे होते. आम्ही तिला अनेकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ती यायला तयार झाली नाही.”

या महिलेचे नाव कळू शकलेले नाही. तिच्या पतीचे नाव नरेश कुमार असून या दोघांचा १७ वर्षांपुर्वी विवाह झाला होता. त्यांना मुले असून मोठी मुलगी १५ वर्षांची तर दोन मुले अनुक्रमे ११ आणि १३ वर्षांची आहेत. पतीविरोधात पोलिसांनी कलम ४९८ अ आणि ३४२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पतील अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -